• Download App
    MP Shrikant Shinde खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौऱ्यात वाहनांच्या ताफ्यात कपात; बाईक रॅलींवर देखील कठोर बंदी!!

    खासदार श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौऱ्यात वाहनांच्या ताफ्यात कपात; बाईक रॅलींवर देखील कठोर बंदी!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा हा नाशिक आणि धुळे जिल्ह्या येत्या २१ मे ते २२ मे रोजी पार होणार आहे. या दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेणार आहेत.

    सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने पक्षाच्या पातळीवरही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी पक्षीय कार्यक्रम, बैठका, मेळावे किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कामासाठी जाताना खाली दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी कटाक्षाने पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    – पक्ष बैठकीस / मेळाव्यास येताना स्थानिक लोकप्रतिनिधी / पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकाच वाहनात जास्तीत जास्त साथीदारांना घेऊन प्रवास करावा.

    – बाईक रॅली अथवा वाहनांचा ताफा (Convoy) काढण्यास कडक मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही कारणाने रॅली काढू नये. तसेच, दोऱ्यात किंवा भेटीगाठींच्या वेळी वाहनांचा ताफा सोबत ठेवू नये.

    – सार्वजनिक वाहतूक / विद्युत वाहनांचा (EV) वापर करा. ही सवय दैनंदिन जीवनातही रुजवण्याचा प्रयत्न करावा.

    आपण सर्वसामान्यपणे उचललेली ही छोटी-छोटी पावले देशाच्या इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हातभार लावतील, असे आवाहन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केले आहे.

    Reduction in vehicle fleet during MP Shrikant Shinde’s Shiv Samvad tour

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीतली भांडणे कमी पडली, म्हणून “कळलाव्यां”नी भाजप – शिवसेनेत काल्पनिक भांडणे सुरु केली!!

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचे 30 तारखेपासून पुन्हा उपोषण; म्हणाले – फडणवीसांना मराठ्यांनीच CM केले, पण समाजाचे वाटोळे होणार असेल तर शांत बसणार नाही

    Patel and Tatkare : पटेल-तटकरे आमचेच नेते, पक्षात कोणतेही मतभेद नाहीत; दिल्ली कार्यालयात कोणालाही रोखले नाही, अविनाश आदिकांचे स्पष्टीकरण