• Download App
    एकच ध्यास शिवभक्ती...; बाबासाहेब पुरंदरेंच्या पहिल्या स्मृतिदिनी राज ठाकरेंची भावनिक पोस्टRaj Thackeray's emotional post on Babasaheb Purandre's first memorial day

    एकच ध्यास शिवभक्ती…; बाबासाहेब पुरंदरेंच्या पहिल्या स्मृतिदिनी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे बाबासाहेबांशी राज ठाकरे यांचे अतिशय जवळचे संबंध होते. Raj Thackeray’s emotional post on Babasaheb Purandre’s first memorial day

    आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात :

    आज बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

    बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणं आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची. ही उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली.

    छत्रपती शिवाजी महाराज हा विचार घराघरात पोहचवणं हेच जगणं मानणाऱ्या बाबासाहेबांना हयातीतच नको तो मनस्ताप झेलावा लागला, पण त्यावर त्यांनी अवाक्षर काढलं नाही. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. ‘ह्या सम होणे नाही’, असं आपण सहजपणे म्हणतो, खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा ‘शिव’भक्त होणे नाही, पण त्याच वेळेला असं देखील वाटतं माझ्या पिढीचं ठीक आहे पण पुढच्या पिढ्यांना अस्सल आणि उत्तुंग व्यक्तिमत्व कशी बघायला मिळणार?

    असो, काळ हेच त्यावरचं उत्तर आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनी, त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

    – राज ठाकरे

    Raj Thackeray’s emotional post on Babasaheb Purandre’s first memorial day

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर