ठाकरे + पवार + काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मशिदींमधून फतवे; राज ठाकरेंचा गंभीर इशारा!!

Raj Thackeray sabha in Pune for bjp loksabha candidate Murlidhar Mohol

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे निघत आहेत. पुणेकरांसह सगळ्या महाराष्ट्राने वेळीच सावध व्हावे, असा गंभीर इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात दिला. Raj Thackeray sabha in Pune for bjp loksabha candidate Murlidhar Mohol

लोकसभा निवडणुकीची पुण्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रचारसभा झाली. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यावेळी त्यांनी निवडणुकीच्या एक वेगळा पॅटर्न लोकांना उलगडून सांगितला.

राज ठाकरे म्हणाले :

निवडणुकीत काही मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत. मुस्लिम समाज तुमची घरची गुरढोरं आहेत का?? त्यांनाही समजतंय काय राजकारण चाललं आहे. कोण आपल्याला वापरून घेत आहे ते. निवडणुकीच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मतदान करा. जर मशिदींमधून मौलवी असे फतवे काढत असतील, तर आज राज ठाकरे फतवा काढत आहे, भाजपच्या, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा. काँग्रेसच्या लोकांना मतदान करण्याच्या दृष्टीकोनातून अनेक लोकांची जी काही चुळबूळ आहे कशासाठी??, तर 10 वर्षांमध्ये यांना तोंड वरती काढता आलं नाही म्हणून आता ते चुळबुळ करत आहेत.



अनेक चांगले मुसलमान आहेत. जे आपापल्या कष्टाने काम करत आहे. त्यांचा काही विषय नाही. पण काही वाह्यात आहेत. ज्यांना इथे धार्मिक धुमाकूळ घालायचा आहे. ज्यांना याआधी डोकं वर काढता आलं नाही, त्यांना काँग्रेसच्या माध्यामातून डोकं वर काढायचंय म्हणून हे फतवे निघत आहेत. उद्या यांच्या हातात काही गोष्टी गेल्या चुकून तर या रस्त्यावर फिरणं कठीण करतील.

मला आठवतोय 1980 – 90 चा काळ, उन्माद सुरू होता उन्नाद या सगळ्या गोष्टींचा शेवट होता बाबरी मशिदीचा ढाचा पडणं. मला वाटलं नव्हतं परत राम मंदिर देशात बनेल पण नरेंद्र मोदी यांच्यामुळे ते शक्य झालं. जे काम त्यांनी चांगलं केलं, ते चांगलं केलं आहे हे म्हणावंच लागेल.

शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यानंतर जातीपातीचं विष 1999 सालापासून कालवायला सुरूवात झाली आहे. माझे अजित पवारांबद्दल अनेक मतभेद असतील. पण शरद पवारांबरोबर राहून देखील अजित पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडल गेला होता. अनेकांना वाटलं नितीन गडकरी यांचे नातेवाईक आहेत. त्यानंतर जेम्स लेन हे प्रकरण आणलं. यातून शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीवाद फैलावला.

Raj Thackeray sabha in Pune for bjp loksabha candidate Murlidhar Mohol

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात