विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणालेत की, मुंबई मनपाच्या निवडणुकीत मतदार यांद्यावर विशेष लक्ष असू द्या. मतदार याद्या तपासून पाहा. मतदार खरा की खोटा? हे तपासून पाहा. रात्र वैऱ्याची आहे… त्यामुळे गाफील राहू नका, आजूबाजूला काय सुरू आहे यावर लक्ष असू द्या.Raj Thackeray
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांनंतर लगेचच महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरोधकांकडून सातत्याने निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. आज पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताध्याऱ्यांवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुंबईमध्ये आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते.Raj Thackeray
- Eknath Shinde : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष; एकनाथ शिंदेंचे आश्वासन
रात्र वैऱ्याची… गाफील राहू नका
ठाकरे म्हणाले- थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील. 11 वर्ष हा कोकण महोत्सव साजरा होत आहे. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, रात्र वैऱ्याची आहे गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, मतदार याद्यांमध्यो जो काही घोळ होतोय, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने करडी नजर ठेवा. मतदार खरा आहे की खोटा आहे, याच्यावरती पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे.
मराठी माणसासाठी मुंबई मनपा शेवटची निवडणूक
ठाकरे पुढे म्हणाले की, मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल, असंही ते म्हणाले. जर आपण गाफील राहिलो, तर निवडणूक हातातून गेली समजा. थोडे दिवस थांबा भाषणं सुरूच होतील, असेही राज ठाकरे म्हणाले.
मनसे, शिवसेना ठाकरे गट युती
दरम्यान, मुंबई महापालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युती होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात देखील दोन्ही पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने मनसेसोबत युती करण्यास नकार दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहेत.
Raj Thackeray BMC Election Warning Marathi Manus Voter List Photos Videos Speech
महत्वाच्या बातम्या
- SIR False : SIRमध्ये चुकीची माहिती दिल्यास एक वर्ष शिक्षा; निवडणूक आयुक्त म्हणाले- BLO फॉर्ममध्ये OTP मागत नाही
- Delhi-NCR : दिल्ली-NCR मध्ये प्रदूषणाशी संबंधित नियम बदलले; AQI 200+ असल्यावर ऑफिसच्या वेळा बदलतील
- शरद पवारांची लवकरच दिल्ली वारी, काँग्रेसच्या दरबारी करणार मनसेची वकिली!!
- US-Russia : ट्रम्प-पुतिन अधिकाऱ्यांमधील गुप्त बैठकीवरून वाद; युक्रेन युद्ध संपवण्याची योजना येथेच रचल्याचा दावा