Voter List : मतदार यादीत मोठी शुद्धीकरण मोहीम! 30 कोटी मतदारांचे धूसर फोटो हटणार; घराघरांत पडताळणी, बनावट मतदारांवरही कारवाई
देशातील मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम (Special Intensive Revision – SIR) हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी मतदारांची घराघरांत जाऊन पडताळणी केली जात असून, मतदार ओळखपत्रांमध्येही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, सुमारे 30 कोटी मतदारांच्या ओळखपत्रांवरील धूसर, जुने किंवा अनुपस्थित फोटो बदलले जाणार असून मतदारांच्या पत्त्यांची माहितीही अधिक अचूक केली जाणार आहे.