• Download App
    कर्नाटकातील माजी आमदाराच्या जुगार अड्ड्यावर सोलापुरात छापा; २९ जणांच्या अटकेने खळबळ । Raid on former MLA's gambling den in Solapur; Sensation of arrest of 29 people

    कर्नाटकातील माजी आमदाराच्या जुगार अड्ड्यावर सोलापुरात छापा; २९ जणांच्या अटकेने खळबळ 

    वृत्तसंस्था

    सोलापूर : कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना जुगार प्रकरणात अटक झाली आहे.त्यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. Raid on former MLA’s gambling den in Solapur; Sensation of arrest of 29 people

    सोलापुरातील होटगी रोडवरील क्लब ९ येथे जुगार सुरू होता. गुन्हे शाखेने हॉटेलवर छापा टाकला. स्वतः रविकांत पाटील हा जुगार अड्डा चालवत असल्याचा आरोप पोलिसांचा आहे. त्यावेळी रविकांत पाटील हे स्वतः हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यासह बसलेले होते. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.



    हॉटेलमध्ये तपासणी केली तेव्हा १९जण हे जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून रोख २ लाख २४ हजार ५४० रुपये, ४ लाख १९ हजारांचे मोबाईल, १३ हजारांचे जुगार साहित्य असे एकूण ६ लाख ५७हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री उशीरा आरोपींची जामिनावर मुक्तता केली. रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच कर्नाटकातील त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती.

    Raid on former MLA’s gambling den in Solapur; Sensation of arrest of 29 people

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा