• Download App
    Radhaswami maharaj राधानाथ स्वामी महाराजांचे मुसळधार पावसातही रामतीर्थावर गोदावरी पूजन!!

    Radhaswami maharaj राधानाथ स्वामी महाराजांचे मुसळधार पावसातही रामतीर्थावर गोदावरी पूजन!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने इस्कॉनचे वरिष्ठ संत श्रीपाद राधानाथ स्वामी महाराज यांना आरतीसाठी आज आमंत्रित केले होते. परंतु, मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम भव्य स्वरूपात होऊ शकला नाही. तरीही राधानाथ स्वामी महाराजांनी गोदावरी रामतीर्थावर गोदावरी पूजन आणि ध्यान केले. Radhaswami maharaj godavari poojan

    रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरीत महाआरती आणि संत दर्शन सोहळ्याची जय्यत तयारी केली गेली होती. विशेष स्टेज, रांगोळी, भव्य साऊंड सिस्टम आणि लाईट यांचे मोठे आयोजन करण्यात आले होते. परंतु, मुसळधार पाऊस पडल्यामुळे सर्व स्टेज आणि सिस्टम काढावी लागली.

    राधानाथ स्वामीजींनी सांगितलं, की मला गोदावरी महाआरतीचा अमृत अनुभव घ्यायचा आहे म्हणून मी उद्या परत येईन. असे असूनही मुसळधार पावसात त्यांनी गोदा पूजन केले आणि प्रतिकात्मक आरती केली. गोदावरीचे ध्यान केले आणि मग पुढच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रस्थान केले.

    Radhaswami maharaj godavari poojan

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल, यात शंका नाही; राम मंदिर बांधण्याबाबतही लोकांना शंका होती, त्याचप्रमाणे हे ध्येयही आता निश्चित

    Rohit Pawar : हा भोंदू महाराष्ट्रात दिसता कामा नये; आमदार रोहित पवार संतापले- ‘भोंदू बागेश्वर’ म्हणत बंदीची मागणी

    Fadnavis : बागेश्वर बाबांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका; उद्धव ठाकरेंच्या भेटीचे वृत्तही फेटाळले, म्हणाले- लपून भेटण्याची गरज नाही