• Download App
    पुणेकरांची 'शान' असलेली सिंहगड एक्स्प्रेस धावली तब्बल १९ महिन्यांनी सुरु: प्रवाशांना दिलासा|Punekar's 'favorite ' Sinhagad Express ran

    WATCH : पुणेकरांची ‘शान’ असलेली सिंहगड एक्स्प्रेस धावली तब्बल १९ महिन्यांनी सुरु: प्रवाशांना दिलासा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई मार्गावरची सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती. ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती.ती आजपासून सुरू झाली आहे.आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटीला हार घालून स्वागत केले. आजपासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे .Punekar’s ‘favorite ‘ Sinhagad Express ran

    पुण्यावरून ही रेल्वेगाडी (क्र. ०१००९) पहाटे ६ वाजून ०५ मिनिटांनी निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी पोचली.ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल.



    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी (क्र. ०१०१०) सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी निघेल आणि रात्री १० वाजता पुण्यात पोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.पुणे व मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईला ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची आहे.

    • पुणेकरांची ‘शान’ असलेली सिंहगड एक्स्प्रेस धावली
    • तब्बल १९ महिन्यांनी पुन्हा प्रवास सुरु झाला
    • स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटीला हार घातला
    • पहाटे ६ वाजून ०५ मिनिटांनी पुण्यातून रवाना
    •  मुंबईला सकाळी ९ नंतर पोचली
    • पुण्या- मुंबईतील कर्मचाऱ्यांचीची मोठी सोय

    Punekar’s ‘favorite ‘ Sinhagad Express ran

     

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर