• Download App
    PUNE : शिवणेत एका इमारतीच्या पार्किंगमधील आगीत १३ दुचाकी व २ रिक्षा जळून खाक। PUNE: A fire broke out in the parking lot of a building in Shivne, burning 13 two-wheelers and 2 rickshaws

    PUNE : शिवणेत एका इमारतीच्या पार्किंगमधील आगीत १३ दुचाकी व २ रिक्षा जळून खाक

    अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत सर्व वाहनांनी पेट घेतला होता.दरम्यान जवानांनी तातडीने ही आग विझविली. PUNE: A fire broke out in the parking lot of a building in Shivne, burning 13 two-wheelers and 2 rickshaws


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शिवणे येथील शिवकमल प्रेस्टीज या इमारतीच्या पार्किंगमधील १३ दुचाकी आणि २ रिक्षा आगीत जळून खाक झाली.दरम्यान ही घटना बुधवारी पहाटे ५ वाजता घडली.शिवकमल प्रेस्टीज ही ५ मजली इमारत आहे.पार्किंगमधील वाहनांना पहाटे ५ वाजता आग लागल्याची खबर अग्निशमन दलाला मिळाली.दरम्यान अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या.

    दरम्यान तोपर्यंत सर्व वाहनांनी पेट घेतला होता.दरम्यान जवानांनी तातडीने ही आग विझविली.अग्निशमन दलाचे अधिकारी उमराटकर यांनी सांगितले की, पार्किंगमध्ये अनेकदा शॉट सर्किट होतात आणि आग लागते.अशीच आग तेथील वाहनांना आग लागल्याचे दिसून येते. मात्र, या इमारतीतील विद्युत मीटरच्या बॉक्सपर्यंत आग पोहचलीच नाही.त्यामुळे तेथून आग लागली नाही.



    दरम्यान ज्या वाहनाला पहिली आग लागली, त्याच्यावर पार्किंगमधील ट्युबलाईट जळाली आहे. या इमारतीतील नागरिकांनी सांगितले की, ट्युबलाईट फुटल्याचा आवाज आल्याने आम्ही सगळे खाली आलो, आणि पाहतोय तर सर्व वाहने एकाचवेळी पेटलेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला.

    PUNE: A fire broke out in the parking lot of a building in Shivne, burning 13 two-wheelers and 2 rickshaws

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी फेटाळली शरद पवारांची टीका; म्हटले- जो जीता वही सिकंदर! लोकांनी आम्हाला मतदान केले, त्यांना दोष देण्याचे कारण काय?

    Sharad Pawar Group : भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का? काँग्रेसच्या ‘स्वबळा’च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल

    Nitesh Rane : नीतेश राणेंचा काँग्रेस, मनसेला टोला, म्हणाले- काँग्रेस अन् मनसे एकमेकांचा दर्जा ठरवत आहेत, आपण लांबूनच हसलेले बरे