विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका पटलेली नाही म्हणून एनडीएतून बाहेर पडतोय, असं कुणी बोललं नाही. त्यावेळी तुमचा हा कळवळा कुठे गेला होता? असा प्रश्न भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंड यांनी केला आहे.Pritam Munde, Navneet Rana asked Shiv Sena where did your sympathy go on the issue of Maratha reservation?
प्रीतम मुंडे म्हणाल्या, केंद्र सरकारने १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक मांडले. यामुळे राज्यांना मागास समाजांना आणि जातींना आरक्षण देता येणार आहे. राज्यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. हा लोकशाहीचा सन्मान आहे. पण यावेळी सर्व चर्चा ही फिरून फिरून मराठा आरक्षणावर आणली जात आहे. ज्यांना मराठा आरक्षणाचा प्रचंड कळवळा आहे, त्यांनी हायकोटार्ने मराठा आरक्षण वैध ठरवल्यावर कोणी का बोललं नाही? आज जे विरोधात आणि त्यावेळी भाजपबरोबर सत्तेत होते. केंद्र सरकारला ओबीसींचा कळवळा आहे. हे आजच्या विधेयकावरून दिसतंय असे नाही.
ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळवण्याचा मुद्दा असेल, सवर्णांना १० टक्के आरक्षण असेल. ओबीसींना मेडिकलमध्ये आरक्षणाचा विषय असेल किंवा मंत्रिमंडळात ओबीसींना दिलेलंस्थान असेल यावर केंद्र सरकारने ठामपणे भूमिका मांडली आहे. केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत, फक्त भाषणं दिलेली नाहीत. आज मराठा आरक्षणावर मराठा तरुणाच्या त्याच्या शिक्षणासाठी किंवा त्याला नोकरी मिळवून देण्यासाठीची तळमळ आहे का? तर अजिबात नाही. कुठेतरी आपली वोटबँक निघून जाईल आणि आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही तर त्याचं खापर आपल्या डोक्यावर फुटेल की काय? या भीतीतून हा कळवळा येत नाही ना?
मुंडे म्हणाल्या, ज्यांना आज काही ठरावीक समाजांचा कळवळा येतोय त्यांना ओबीसींशी काही देणंघेणं नाही का? त्यांच्याकडे फक्त वोटबँक म्हणूनच बघणार आहात का? राज्य सरकारने ओबीसी आरक्षण २७ टक्क्यांच्यावर गेलं अशी कबुली सुप्रीम कोर्टात दिली. मग ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे राजकीय आरक्षण काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? याचं उत्तर कोण देणार? तुम्ही एका ठराविक जाती किंवा समाजासाठी सरकार चालवताहेत का? ओबीसींशी तुमचं काहीच देणंघेणं नाहीए का?
हा कळवळा आणि ही तळमळ ओबीसींवर होत असलेल्या अन्यायावेळी का दिसून येत नाही? असा प्रश्न प्रीतम मुंडेंनी यांनी केला. केंद्र सरकारची भूमिका ही सर्व समाजांना आणि जातींना एकत्रित पुढे घेऊन जाण्याची आहे आणि न्याय देण्याची आहे. यासाठी १० टक्के सवर्णांच्या आरक्षणांचा मुद्दा आपण उपस्थित केला.
आमचं अस्तित्वात असलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण घालण्याचं पाप महाराष्ट्रातील सरकारने केलेलं आहे. ही आजची ओबीसींची स्थिती आहे, असे सांगून मुंडे म्हणाल्या, ओबीसी समाज तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. कारण राज्य सरकार आपली भूमिका मांडण्यात अपयशी ठरलं आहे. फक्त ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा नाहीए तर एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या होत नाही. कारण आरक्षणावर निर्णय होत नाहीए. या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळेल? एमपीएसची आयोगावर ठराविक एका जातीचेच लोक नियुक्त केले जातात. इतर जातींकडे का दुर्लक्ष केलं जातं? या प्रश्नांची तुम्ही उकल केली तर तुम्ही खरंच वंचितांचे विषय उचलताय हे सिद्ध होईल.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून एकच कार्यक्रम सुरू आहे. चांगलं केलं तर ते आम्ही, वाईट झालं तर ते केंद्र सरकारने केलं, असं चाललं आहे. पण केंद्र सरकारने ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजालाही यातून न्याय मिळेल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी दोन दिवसांचं विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं. गेल्या ६० ते ७० वर्षांत ओबीसींना न्याय का दिला गेला नाही. सरकारने सोन्याचं ताट समोर ठेवलंय.
पण त्यात लोणचं आहे ना, जेवण, असं शिवसेनेचे नेते म्हणाले. पण ३२ वर्षे ज्या पक्षाबरोबर तुम्ही सोन्याच्या ताटात जेवले, लोणचंही खाल्लं तेव्हा सर्व तुम्हाला मिळत होतं. आता हे सोन्याचं ताट पाहून शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल आणि सत्ता स्थापन करेल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनाचं खूप मजेदार धोरण आहे. पोटात एक आणि ओठात एक, अशी शिवसेनेची भूमिका कायम राहिली आहे. शिवसेना ओबीसींच्या न्याय देण्याच्या हितात ते नाही.
Pritam Munde, Navneet Rana asked Shiv Sena where did your sympathy go on the issue of Maratha reservation?
महत्त्वाच्या बातम्या
- कुस्ती महासंघाकडून विनेश फोगाट निलंबित, टोकियो ऑलिम्पिकमध्ये गैरवर्तन आणि गोंधळ करणे भोवले
- धक्कादायक : ‘फक्त 11 मिनिटे बलात्कार झाला’ म्हणत कोर्टाने कमी केली आरोपीची शिक्षा, न्यायाधीशांविरोधात स्थानिकांचे रस्त्यावर उग्र आंदोलन
- काश्मीर दौऱ्यावर राहुल गांधींना आठवली कश्मिरियत, म्हणाले – मीसुद्धा काश्मिरी पंडित, पूर्ण राज्यासाठी लढा देऊ !
- स्वच्छ राजकारणासाठी सुप्रीम कोर्टाचे मोठे पाऊल : राष्ट्रवादीला 5 लाखांचा, तर काँग्रेस-भाजपसह इतर पक्षांना एक लाखाचा दंड, उमदेवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर न केल्याने दणका