Navneet Rana : शेरनी अगर शांत है, तो डकारना नहीं भूलती; नवनीत राणांचा विरोधकांना थेट इशारा, स्वाभिमानामुळे राज्यसभेला ठोकर मारल्याचा दावा
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ‘माजी खासदार’ झाल्याचे शल्य मनात असले तरी आपण शांत बसलेलो नाही, असा सज्जड इशारा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी विरोधकांना दिला आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला. यावेळी त्यांनी राज्यसभा खासदारकीवरूनही मोठा दावा केला आहे.