• Download App
    शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे; "मोकळे" राणा दाम्पत्य मैदानात उतरले!! Obstacles faced by NCP in front of Shiv Sena; "Free" Rana couple enters the arena!

    BMC Elections : शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे; “मोकळे” राणा दाम्पत्य मैदानात उतरले!!

    शिवसेनेसमोर राष्ट्रवादीचे अडथळे; “मोकळे” राणा दाम्पत्य मैदानात उतरले…!! या शीर्षकात कोणतेही रॉकेट सायन्स नाही. ज्या नवनीत राणा अमरावतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याच्या बळावर शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून लोकसभेत पोहोचल्या, त्या नवनीत राणा यांनी आता लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच खांद्यावर भगवी शाल आणि हातात हनुमंताची मूर्ती घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे.
    Obstacles faced by NCP in front of Shiv Sena; “Free” Rana couple enters the arena!



    आपण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध प्रचार करणार आहोत. मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, त्या मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवू, असे खुले आव्हान नवनीत राणा यांनी दिले आहे हाच तो राष्ट्रवादी प्रणित शिवसेनेसमोर अडथळा आहे…!! भले मग नवनीत राणा यांच्या खांद्यावर रामाची भगवी शाल, हातात हनुमंताची मूर्ती आणि हनुमान चालीसा असेल, त्यांचे शरसंधान शिवसेना नावाच्या हिंदुत्ववादी पक्षावर असणारा आहे…!! त्यांना तुरुंगात दिलेला त्रास नक्कीच या मागे आहे. आता त्या थेट केंद्र सरकार कडे शिवसेनेची तक्रार करणार आहेत. नवनीत राणा यांना तुरूंगात झालेला त्रास त्यांचे हनुमान चालीसाचे आंदोलन हे कितीही जरी हिंदुत्ववादी शाल पांघरणारे असले तरी एक राजकीय वस्तुस्थिती मात्र विसरता येत नाही, ती म्हणजे त्यांचे आजही शरद पवारांशी निकटचे संबंध आहेत. त्यांनी ते आपण तुरुंगात जाण्यापूर्वीच्या शरद पवारांच्या दौऱ्यात कबूल केले आहेत आणि आता त्या आपले पती आमदार रवी राणा यांच्या समवेत मुंबई महापालिकेत शिवसेना विरुद्ध तुफानी प्रचार करणार आहेत.

    हाच खऱ्या अर्थाने भाजपला देखील कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रकार आहे. नवनीत राणा शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार याचा अर्थ त्या 100 % भाजपला अनुकूल प्रचार करणार असा जर कोणी घेत असेल तर ती राजकीय दृष्ट्या चूक ठरू शकते. जोपर्यंत त्या उघडपणे भाजपचा झेंडा खांद्यावर घेत नाहीत, तोपर्यंत तरी हे सत्य नाकारता येणार नाही.

    नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज, त्या मुख्यमंत्र्यांविरोधात महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशा बातम्या माध्यमांनी जरूर दिले आहेत. पण त्यामागचा “राष्ट्रवादी कावा” मात्र फारसा कोणी उलगडून सांगितलेला दिसत नाही.

    उद्धव ठाकरे यांची मन की बात

    उद्धव ठाकरे 14 मे रोजी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर आपली “मन की बात” करणार आहेत. आपले काहीही तुंबलेले नाही. आपण मनातले बोलणार असे ते म्हणाले आहेत. शिवसेनेने 14 तारखेच्या सभेसाठी टिझरही प्रसिद्ध केला आहे. बाळासाहेबांचा वारसदार शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे. आता या संवादात बाळासाहेबांचे वारसदार नेमके कुणावर शरसंधान साधणार??, हे सांगायला फार मोठ्या तज्ञाची गरज नाही. पण उघडपणे शरसंधान साधताना बाळासाहेबांचे वारसदार “नेमक्या कोणाला: जखमा करतात…??, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे…!!

    Obstacles faced by NCP in front of Shiv Sena; “Free” Rana couple enters the arena!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले!!