Pritam Munde : प्रीतम मुंडे म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलू शकतं, तर बीडमध्ये का नाही? आता ‘शतप्रतिशत भाजप’ हवा
पश्चिम बंगालसारख्या आव्हानात्मक राज्यात जर आपण भाजपचे कमळ फुलवू शकतो, तर बीड जिल्ह्यात ते का शक्य नाही? येथील कार्यकर्त्यांची परिस्थिती बंगालपेक्षा वेगळी आहे का? तुम्हालाही तिथे मिळणारा त्रास सहन करावा लागतोच आहे ना? जर आपल्याला ‘शतप्रतिशत भाजप’ हा नारा घेऊन पुढे चालायचे असेल, तर पंकजा मुंडे यांच्या जीवावर निवडून येऊन, तीन वर्षे आमदारकी पचवून त्यांच्यावरच गरळ ओकणारे लोक आता नको आहेत,