राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती


अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मतदान करण्यासाठी सपत्नीक आले होते तेव्हा अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.Preparation of oxygen and ventilator started in the state; Information given by Deputy Chief Minister Ajit Pawar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने काही निर्बंध घालण्यात आले आहेत.दरम्यान यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राज्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात संकेत दिले होते.

तसेच अजित पवार यांनी आज राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं आहे.अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मतदान करण्यासाठी सपत्नीक आले होते तेव्हा अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधलाअजित पवार म्हणाले की, जिल्हा नियोजनातील २० टक्के खर्चाची मान्यता दिली आहे. सगळ्यांनी नियमांचं पालन करावं. मी ५० पेक्षा जास्त लोक असतील तर मी कार्यक्रमाला जाणार नाही. आता मी विचारून कार्यक्रमाला जाणार आहे. आमच्यासहित सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. कारण आम्ही जर पालन केलं नाही तर लोकांना कोणत्या तोंडाने सांगणार.तसेच महाराष्ट्रात सगळ्यांनी लस घ्यावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आहे.राज्य सरकारने दिलेल्या नियमांच पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं.

Preparation of oxygen and ventilator started in the state; Information given by Deputy Chief Minister Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात