अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल बाहेर; विकसित बारामतीत विमानतळावर सुरक्षेच्या गंभीर त्रुटी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजित पवारांच्या विमाना अपघाता संदर्भात DGCI ने आपला प्राथमिक अहवाल आज जाहीर केला त्यामध्ये 22 पाने आहेत. या अहवालानुसार पवारांनी गेले कित्येक वर्ष विकसित केलेल्या बारामतीत विमानतळावर मात्र सुरक्षेच्या गंभीर त्रुटी असल्याचे DGCI ला आढळले. दोन्ही पायलट्सनी उड्डाणाच्या वेळी मद्यपान केलेले नव्हते. विमानाला आग लागल्यानंतर प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने ब्लॅक बॉक्स मधला डेटा खराब झाला, पण तो डाउनलोड करण्यात यश आले. मात्र बारामती विमानतळावर सुरक्षा विषयक गंभीर त्रुटी आहेत, अशा आशयाचे निष्कर्ष डीजीसीआयने या अहवालात नोंदले.

– विमानतळाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

एरवी शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामती विकसित केली. तिथे जागतिक पातळीवरच्या सुविधा आणल्या, असे म्हटले जाते, पण शरद पवार आणि अजित पवार यांनीच विकसित केलेल्या बारामतीत विमानतळाच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. कारण DGCI ने जाहीर केलेल्या अहवालात बारामतीतल्या विमानतळाच्या सुरक्षाविषयक गंभीर त्रुटींबद्दल सविस्तर भाष्य केले.

अहवालातली निरीक्षणे अशी :

  • बारामती विमानतळाच्या रन वे वर मार्किंग नीट दिसत नाही. कारण ते 2016 मध्ये केले आहे. बारामती विमानतळाची दुरुस्ती आणि हवाई पट्टीची दुरुस्ती 2016साली झाली त्यानंतर हवाई पट्टीची दुरुस्ती झाली नाही.
  • रन वे वर बारीक खडी आढळली. रन वे परिसराला सुरक्षा कुंपण नाही.
  • बारामतीच्या विमानतळावर अग्निशमन व्यवस्था (ARFF) उपलब्ध नाही
  • बारामती विमानतळावर फक्त VFR ऑपरेशन्सना परवानगी
  • बारामती विमानतळ अनकंट्रोल्ड एअफिल्ड तिथे (ATC) सुविधा उपलब्ध नाही.
  • विमानातल्या फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि व्हॉइस डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड.
  • विमान चालवण्याच्या वेळी दोन्ही पायलट्सने मद्यपान केलेले नव्हते. त्यांची ब्रीद अनालायझर्स टेस्ट निगेटिव्ह आली होती. दोन्ही पायलट्सना विमान चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव होता.
  • विमानतळाच्या सुरक्षेसंबंधी विविध सूचनांचे पालन आवश्यक

Preliminary report on Ajit Pawar’s plane crash out

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात