पवारांचा आदेश धुडकावून अजितदादांच्या मेळाव्यात भुजबळांच्या एमईटीत शरद पवारांची पोस्टर्स!!; 41 आमदार गटात असल्याचा तटकरेंचा दावा


प्रतिनिधी

मुंबई : आज 5 जुलैच्या शक्तिप्रदर्शनात अजित पवार गटाने शरद पवारांचा आदेश धुडकावून त्यांची पोस्टर्स छगन भुजबळांच्या एमईटी या मेळावास्थानी झळकवली आहेत. अजित पवार गटात 41 आमदार असल्याचा दावा त्यांनी नेमलेले प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. Posters of Sharad Pawar in Bhujbal’s MET in Ajitdad’s gathering defying Pawar’s order

बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा राज ठाकरे यांना आपली पोस्टर्स लावू नये असे खडसावले होते त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या ऐकून बाळासाहेबांची पोस्टर्स मनसेच्या कार्यक्रमात लावणे बंद केले होते पण अजितदादांनी पवारांनी तसाच इशारा देऊन देखील शरद पवारांची पोस्ट जळकावणे बंद केलेले नाही त्यामुळेच शरद पवार “डबल गेम” खेळत असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आणि महाराष्ट्रात पसरला आहे.

83 वर्षांचा योद्धा निघाला अशी पोस्टर्स शरद पवार गटाने अजित पवारांच्या मार्गावर झळकवली आहेत पण त्यातून अजित पवारांच्या गटाला काही फरक पडलेला नाही त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या गटात 41 आमदार असल्याचा दावा करून सिल्वर उपवर शरद पवारांना भेटायला गेलेले आमदार देखील आमच्या बैठकीला येतील, असा दावा केला आहे.

माझ्या हयातीत माझ्या परवानगीशिवाय पोस्टर्स लावू नयेत असे शरद पवारांनी कालच अजितदादांना खडसावले होते. पण अजितदादांनी कालही त्यांचे ऐकले नव्हते. राष्ट्रवादीच्या विधिमंडळ कार्यालयात अजित दादांनी शरद पवारांचे पोस्टर लावले आणि आजही छगन भुजबळांच्या मध्ये आमदारांच्या बैठकीसाठी सजवलेल्या स्टेजवर शरद पवारांची पोस्टर्स लावली आहेत. या स्टेजवर आमदारांसाठी 32 खुर्च्या मांडल्याची बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

Posters of Sharad Pawar in Bhujbal’s MET in Ajitdad’s gathering defying Pawar’s order

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात