मुंबईमधील दीपा बार मधील आरश्यामागील भिंतीत असणाऱ्या सिक्रेट रूममधून पोलिसांनी १७ कैद मुलीची केली सुटका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई मधील अंधेरी पोलिसांना एक माहिती मिळाली की, दीपा बार अंधेरी येथे कोरोनाच्या नियमांची सीमा ओलांडून रात्रभर बार चालू असतो. ह्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बारवर 12 डिसेंबर रोजी छापा टाकला. पण सर्व कोरोनाचे नियम पाळून व्यवस्थित बार चालू असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांनी संपूर्ण बार तपासून पहिला. पण त्यांना काहीही वेगळे आणि नियमाविरुद्ध चालू असल्याचे आढळून आले नाही. त्यांनी आपल्या सुत्रांना याबाबत पुन्हा एकदा विचारले तर बातमी खरी आहे असे त्याने सांगितले.

Police release 17 captive girls from secret room behind mirror in Deepa Bar, Mumbai

म्हणून पुन्हा म्हणजे 13 डिसेंबर रोजी पोलिसांनी तिथे छापा मारला. ह्यावेळी देखील सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. बाथरूम, किचन सर्वकाही पोलिसांनी तपासून पाहिले. त्यांना काहीही अपरिहार्य आढळून आले नाही. तिथे एक ग्रीन रूम होती आणि त्या ग्रीन रुम मध्ये एक आरसा होता. तो आरसा पाहून पोलिसांना थोडी शंका आली.


पोलिस पैशांसाठी छळतात; डान्सबार मालकाचा गौप्यस्फोट; ठाणे – डोंबिवलीत बेकायदा वसुली


जेव्हा हा आरसा फोडण्यात आला, तेव्हा तिथे भिंतिमध्ये एक छोटा दरवाजा दिसला. जो एक इलेक्ट्रॉनिक दरवाजा होता. त्या निमुळत्या दरवाज्याच्या मागे भिंतीत एक छोटी रूम आढळून आली. त्या रूम मध्ये एकूण 17 मुलींना कैद करून ठेवण्यात आले होते. एक एक करून त्या मुलींना बाहेर काढण्यात आले. नंतर रूमची पाहणी केल्या नंतर असे आढळून आले की, रूम मध्ये एकही खिडकी नाही की पुरेशी जागा. व्हेंटिलेशन साठी एक एसी आहे. खाण्याचे काही सामान आहे.

ह्या छाप्यानंतर पोलिसांनी बार मालकासह एकूण 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Police release 17 captive girls from secret room behind mirror in Deepa Bar, Mumbai

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात