विशेष प्रतिनिधी
पुणे : कोथरुड, चांदनी चौक येथे आग लागून पीएमपी बस खाक झाली. आज दुपारी 2 नंतर ही दुर्घटना झाली. बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले.अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. PMP bus ash from fire; One injured
आग विझवताना कोथरुड अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर आग शमविताना भाजून किरकोळ जखमी झाले. त्यांच्या चेहरा व हाताला भाजले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या प्रकृती स्थिर आहे. संबंधित अधिकारी पाथ्रुडकर यांचा आज वाढदिवस (वय 54) आहे.
बसने अचानक पेट घेतला. ही घटना या घटनेमुळे कोथरुड आणि पाषाण अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवत असताना अचानक भडका उडाल्याने अग्निशमन दलाचे पाथरुडकर जखमी झाले. त्यांना तातडीने चेलाराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App