पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. PM Security Breach: Why do you defame Punjab by promoting fake farmers? ; Comedian Raju Srivastava expresses anger over Congress
विशेष प्रतिनिधी
मुंबई : फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले.
या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि काँग्रेस परस्परांवर टीका करत आहेत .दरम्यान याच पार्श्वभूमीवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवने व्हिडीओ शेअर करत कॉंग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.
राजू श्रीवास्तवने व्हिडीओ शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘नेहमी लक्षात ठेवा, जंगलातला वाघ एकदा जखमी झाला की संपूर्ण जंगल शांत होऊन जातं. अरे कॉंग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही. कारण मोदीजींवर गुरु, गुरुनानक देव, बाबा विश्वनाथ, बाबा केदारनाथ, बाबा महाकाल यांचा आशिर्वाद आहे.
Congress Ke Logo Punjab Ko Badnam Mat Karo ..#BharatStandsWithModiJi pic.twitter.com/jmnXM0BX86 — Raju Srivastav (@iRajuSrivastava) January 5, 2022
Congress Ke Logo Punjab Ko Badnam Mat Karo ..#BharatStandsWithModiJi pic.twitter.com/jmnXM0BX86
— Raju Srivastav (@iRajuSrivastava) January 5, 2022
पुढे राजू श्रीवास्तव म्हणाले की , “नकली शेतकऱ्यांना पुढे करुन पंजाबची बदनामी का करता? आपल्या पंतप्रधानांना अपमानित करत आहात? तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App