‘…म्हणून ‘पीओके’च्या लोकांना स्वत:हून भारतात सामील व्हायला आवडेल’

People of PoK would like to join India on their own Rajnath Singh

काश्मीरबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा! People of PoK would like to join India on their own Rajnath Singh

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरबाबत नेहमीच तणाव असतो. आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, भारताने बळजबरीने पीओकेवर कब्जा करण्याची गरज नाही कारण काश्मीरचा विकास पाहिल्यानंतर तेथील लोकांना स्वतःच भारताचा भाग व्हायला आवडेल.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील स्थिती बरीच सुधारली आहे. ते पुढे म्हणाले की, येथे निश्चितपणे निवडणूक होणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी कोणतीही मुदत दिली नाही.

ते म्हणाले, ‘मला वाटते भारताला काही करावे लागणार नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारे ग्राउंड परिस्थिती बदलली आहे, ज्या प्रकारे या प्रदेशात आर्थिक प्रगती होत आहे आणि ज्या प्रकारे शांतता परत आली आहे, मला वाटते की पीओकेचे लोक स्वत:हून याला भारतात समाविष्ट करण्याची मागणी करू लागतील.’

People of PoK would like to join India on their own Rajnath Singh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात