पवारांचे ड्रीम हिल स्टेशन लवासावर दरड कोसळली, 2 बंगले ढिगार्‍याखाली, 4 जण बेपत्ता!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असताना शरद पवारांचे ड्रीम हिल स्टेशन लवासावर दरड कोसळली आहे या दरडीच्या ढिगाऱ्याखाली दोन बंगले गाडले गेले असून त्यातल्या चार व्यक्ती बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे Pawar’s dream hill station Lavasa collapses, 2 bungalows under rubble, 4 people missing!!

अतिवृष्टीमुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच पुण्याच्या लवासामधून एक दुर्घटना समोर आली आहे. लवासा हिल स्टेशनवर दोन बंगल्यावर दरड कोसळली या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.



स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिमुसळधार पावसामुळे लवासा हिल स्टेशन येथे दरड कोसळली. यामुळे दोन बंगले ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून यात २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाला माहिती देऊनही अद्याप कोणीही मदतीसाठी न पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच ४५३.५ मिली मिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळेच या ठिकाणी दुर्घटना घडून नागरिकांना मोठा फटका बसला आहे. पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Pawar’s dream hill station Lavasa collapses, 2 bungalows under rubble, 4 people missing!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात