• Download App
    Pawar family बारामतीच्या सांगत सभेत आज पवार कुटुंबीयांचे शक्तिप्रदर्शन; तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे राज्यभर शक्तिप्रदर्शन!!

    बारामतीच्या सांगत सभेत आज पवार कुटुंबीयांचे शक्तिप्रदर्शन; तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे राज्यभर शक्तिप्रदर्शन!!

    नाशिक : बारामती पोटनिवडणुकीत आजच्या प्रचार सांगता सभेत पवार कुटुंबीयांचे शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर शक्तिप्रदर्शनाला चालना दिली. Pawar family

    बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात अपयश

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घ्यावी लागली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पवार कुटुंबीयांनी भरपूर प्रयत्न केले. पण त्यांना फक्त उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांनी साथ दिली. पण बारामतीतून बाकीच्या अपक्षांनी माघार घेतली नाही. त्यांना काही लोकांनी उभे केल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला. पण तरीसुद्धा अपक्ष उमेदवार माघार घेण्यासाठी बधले नाहीत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक प्रत्यक्ष मतदानाद्वारे होणे अपरिहार्य झाले. सगळ्या पवार कुटुंबीयांना बारामतीत गावागावांमध्ये जाऊन प्रचार करावा लागला. सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडून आणा तीच अजित पवारांना श्रद्धांजली असेल, असे पवार कुटुंबीयांनी प्रचारादरम्यान सांगितले.

    बारामतीत पवार कुटुंबीयांचे शक्तिप्रदर्शन

    बारामतीच्या पोटनिवडणुकीची आज सांगता सभा होणार असून या सांगता सभेत पवार कुटुंबीय प्रचंड शक्तिप्रदर्शन करणार आहेत. बारामतीत पवार कुटुंबीयांना शक्तिप्रदर्शन करावे लागते, हीच खरी बातमी आहे. या शक्तिप्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेतून उदय सामंत, रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि मंत्री रामदास आठवले आणि फडणवीस मंत्रिमंडळातले डझनभर मंत्री हजर राहणार आहेत.



    भाजपची युवाशक्ती जागर यात्रा

    एकीकडे पवार कुटुंबीयांची शक्ती बारामतीतल्या शक्तिप्रदर्शनात गुंतली असताना देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापुरातून युवाशक्ती जागर यात्रेचा शुभारंभ केला. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पुष्पराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर युवाशक्ती जागर यात्रा काढत आहे. त्याच यात्रेचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांनी करून भाजप युवा मोर्चा राजकीय दृष्ट्या कामाला लावले. युवकांच्या रोजगार, महिलांची सुरक्षितता, महिला आरक्षण या विषयांवर या यात्रेत भर देण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यभर ही यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजपने आपली सगळी यंत्रणा कामाला लावली आहे.

    शिंदे सेनेचा राज्यभर संपर्क

    दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातून जिथे बाकी कोणी जात नाही, त्या दुर्गम भागात एकनाथ शिंदे जातो आणि विकास करतो, असे सांगून शिंदे सेनेच्या संघटना बांधणीला मजबुती दिली. एकनाथ शिंदे यांनी काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या विस्तारासाठी विविध नेत्यांवर जबाबदारी देऊन त्यांना संपूर्ण राज्यभर पाठविले. संपूर्ण राज्यभरात शिवसेनेचे मेळावे आयोजित करण्याचे नियोजन केले त्यानुसारच शिंदेंनी स्वतःहून साताऱ्यात शिवसेनेचा मेळावा घेतला. भाजपा प्रमाणेच त्यांनी सुद्धा महिला आरक्षणाचा विषय शिवसेनेच्याही ऐरणीवर आणला. पण त्याचवेळी शिवसेना ही स्वतंत्र पक्ष संघटना म्हणून बांधायला चालना दिली.

    पवार कुटुंबीयांचे सगळे लक्ष बारामती वर केंद्रित असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्रातले पक्षाचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी दमदार पावले टाकली.

    Pawar family stuck in baramati, fadnavis – Shinde reaches out in whole Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    MLC Elections : विधान परिषद निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट आमनेसामने

    Supriya Sule : ‘लाडकी बहीण’ योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र? सुप्रिया सुळेंचा सरकारवर विश्वासघाताचा आरोप

    विकसित महाराष्ट्रात एसटीचा कायापालट; सगळ्या बसगड्या 100 % ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प!!