• Download App
    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडी संजय राऊतांची भाषा; म्हणाले, प्रादेशिक पक्षांवर कंट्रोल मोदी + शाहांचा!!

    राहुल गांधींच्या तोंडी संजय राऊतांची भाषा; म्हणाले, प्रादेशिक पक्षांवर कंट्रोल मोदी + शाहांचा!!

    नाशिक : एरवी कुठल्याही राज्यांमधले नेते केंद्रातल्या नेत्यांना फॉलो करतात. राज्यांमध्ये नेते केंद्राच्या नेत्यांचे अनुकरण करतात. केंद्रातल्या नेत्यांच्या तोंडी असलेली भाषा राज्यातले नेते वापरतात.

    पण तामिळनाडूच्या विधानसभा निवडणूक आज उलटीच गंगा वाहिली. एका प्रादेशिक पक्षाच्या प्रवक्त्याची भाषा लोकसभेत विरोधी पक्षानेत्याच्या तोंडी आली.

    लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यासारखीच भाषा वापरली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संस्थापक शिंदे किंवा पवार नाहीत, तर ते मोदी आणि शाह आहेत. त्यामुळे शिंदे सेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यावर मोदी + शाह यांचाच कंट्रोल आहे, असा आरोप संजय राऊत यांनी वारंवार केला.



    तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी संजय राऊत यांच्या आरोपांची कॉपी हाणली. त्यांनी तामिळनाडूतल्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळमघ पक्षावर मोदी आणि शाह यांचा कंट्रोल असल्याचा आरोप केला. त्यासाठी त्यांनी बिहारचे उदाहरण दिले. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुकाट्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते राज्यसभेवर चालले गेले. कारण त्यांच्या राजकीय इतिहासामुळे त्यांना भाजपा बरोबर तडजोड करणे भाग पडले. बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांची जागा भाजपने बळकावली, असा आरोप राहुल गांधींनी केला.

    तामिळनाडू मध्ये अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा मुख्यमंत्री झाला तर त्यांच्यावर सुद्धा मोदी आणि शाह यांचाच कंट्रोल असेल. हे दोघे जे बोलतील ते अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या मुख्यमंत्र्याला करावे लागेल नाहीतर त्यांना सत्ता गमवावी लागेल, असा दावा राहुल गांधींनी केला.

    पण हे सगळे मोठे भाषण करताना राहुल गांधी यांनी संजय राऊत यांच्यात भाषणाची जशीच्या तशी कॉपी हाणली. शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यावर मोदी आणि शाह यांचा कंट्रोल असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. राहुल गांधींनी त्या आरोपाचे रिपीटेशन तामिळनाडू मध्ये जाऊन केले. त्यापलीकडे त्यांनी स्वतःचे कुठलेच भाषण केलेले दिसले नाही.

    Rahul Gandhi says, “Those who control AIADMK are fully controlled by Amit Shah and Mr Narendra Modi.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam : पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीपूर्वी काश्मिरात सुरक्षा वाढवली; 22 एप्रिल रोजी लष्करच्या दहशतवाद्यांनी 26 लोकांची हत्या केली होती

    PM Modi : मोदी म्हणाले- TMC ने बंगालमधील बहिणींची फसवणूक केली; ममतांना बहिणी-मुली मोठ्या संख्येने खासदार व्हाव्यात असे वाटत नाही

    India-Russia : भारत-रशिया एकमेकांच्या भूमीवर 3000 हजार सैनिक तैनात करतील; दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार लागू