• Download App
    Pawar family पवारांच्या राजकारणाची हीच खरी खासियत; घरातल्या नेत्यांचे बस्तान बसवायसाठी अनुयायांची फरफट; पण निर्णायक यश मिळविण्यात नेहमीच अपयश!!

    पवारांच्या राजकारणाची हीच खरी खासियत; घरातल्या नेत्यांचे बस्तान बसवायसाठी अनुयायांची फरफट; पण निर्णायक यश मिळविण्यात नेहमीच अपयश!!

    नाशिक : पवारांच्या राजकारणाची हीच खरी खासियत; घरातल्या नेत्यांचे बस्तान बसवायसाठी अनुयायांची फरफट; पण निर्णायक विजय मिळविण्यात नेहमीच अपयश!! हेच राजकीय वास्तव शरद पवारांनी गेल्या दोन दिवसांमधल्या भेटीगाठींच्या मधून समोर आले.

    सुनील तटकरे यांनी शरद पवारांची दोन दिवसांपूर्वी सिल्वर ओक वर जाऊन भेट घेतली. त्यावेळी म्हणे, तिथे प्रफुल्ल पटेल आधीच हजर होते. प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची गुप्त भेट घेतली, पण त्याची बातमी दोन दिवसानंतर बाहेर आली. सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावरून आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला करून झटका दिल्यानंतर या भेटीगाठी घडल्या. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आपल्या जुन्याच राजकीय गुरूच्या आश्रयाला गेल्याचे दिसले. पण त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याला सुरक्षितता मिळाल्याचे दिसले नाही. त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या कार्यालयाचा ताबा पार्थ आणि जय पवार यांच्याच समर्थकांनी घेतल्याची बातमी समोर आली. आता दिल्लीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात काही विशिष्ट व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल. अन्य व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही, असे त्या बातमीत नमूद केले होते. पार्थ आणि जय पवार यांच्या समर्थकांनी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कार्यालयात येण्यापासून मज्जाव केला ते कार्यालयात आल्यानंतर सुद्धा त्यांना बरेच काही सुनावले.

    राष्ट्रवादी काँग्रेसची लवकरच विस्तारित कार्यकारिणीची बैठक होणार असून त्याविषयी सुनेत्रा पवार यांनी म्हणे, जय पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या सगळ्यांशी चर्चा केली, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या.

    – पवार कुटुंबाची धडपड

    पण या सगळ्या घडामोडींमधून एक बाब अधोरेखित झाली, ती म्हणजे सगळ्याच पवारांना आपल्या कुटुंबाचे राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व टिकवण्यासाठी बरीच मोठी धडपड करावी लागली. किंबहुना पवारांना आपल्या घरातल्या नेत्यांचे राजकीय बस्तान बसवण्यासाठी आपल्याच अनुयायांची फरफट करावी लागली.

    – वापरा आणि बाजूला करा

    अर्थात शरद पवार आणि पवार कुटुंबीयांच्या राजकारणाची ही काही नवीन स्टाईल नाही. ही जुनीच स्टाईल आहे. शरद पवारांना अजित पवारांचे राजकीय बस्तान पुण्यात बसवायचे होते, त्यावेळी त्यांनी सुरेश कलमाडींना आपल्यापासून दूर केले. त्यांच्या राजकीय शक्तीचे खच्चीकरण केले. सुरेश कलमाडींचे खच्चीकरण केल्यानंतरच शरद पवारांना मर्यादित अर्थाने पुणे महापालिकेत अजित पवारांचे राजकीय बस्तान बसवता आले. पण अजित पवार तिथे फारच मर्यादित काळासाठी यशस्वी ठरले. एखाद दुसरु टर्म वगळता अजित पवारांना पुणे महापालिकेवर स्वतःचे वर्चस्व सुद्धा टिकवता आले नाही.

    – सुरेश कलमाडींचा वापर

    शरद पवारांना सुरेश कलमाडी यांचा जोपर्यंत दिल्लीच्या राजकारणात उपयोग होता, तोपर्यंत त्यांनी कलमाडींना आपल्या जवळ ठेवले होते. पण कलमाडींनी सगळे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा शरद पवारांना स्वतःला अपेक्षित असणारे राजकीय बस्तान दिल्लीत बसवता आले नाही. त्यामुळे शरद पवारांनी स्वतःच्या राजकीय अपयशाचे खापर सुरेश कलमाडींवर फोडले होते.

    – प्रफुल्ल पटेल यांनाही तोच अनुभव

    त्यावेळी सुरेश कलमाडींना जो अनुभव आला होता, तोच अनुभव प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना आता आला. त्यापेक्षा वेगळे काही घडले नाही. सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन नेत्यांचा राजकीय वापर करून घेतला. पार्थ पवारला सुद्धा खासदारकी मिळवून दिली. पण भाजपशासित राज्यात स्वतःचे उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद स्थिर झाल्यानंतर मात्र सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना बाहेरचा रस्ता दाखविला.



    – सगळ्याच पवारांना मोठी पदे मिळविण्यात अपयश

    पण एवढे मोठे राजकारण घडवून देखील पवारांपैकी कुठल्याच नेत्याला राजकारणातले अंतिम ध्येय किंवा यश गाठता आले नाही. किंबहुना निर्णायक यश मिळवण्यात अपयश हेच पवारांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

    – पवार बहीण – भावाला मुख्यमंत्री पदाची हुलकावणी

    शरद पवारांनी सुरेश कलमाडींना बाजूला करून अजित पवारांचे राजकीय बस्तान बसवायचा प्रयत्न केला, पण तो मर्यादेच्या पलीकडे जाऊन यशस्वी ठरला नाही. पुण्यात भाजपने अजित पवारांचा सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव केला. स्वतः शरद पवारांना पंतप्रधान व्हायचे होते. त्यासाठी त्यांना कलमाडींची मदत हवी होती. त्यांनी ती मदत घेतली. मदत घेऊन झाल्यानंतर, पवारांनी सुरेश कलमाडींना दूर केले, पण पवारांना कधी पंतप्रधानपद मिळवता आले नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे होते, पण शरद पवारांना त्यांना मुख्यमंत्री करायचे नव्हते. अजित पवारांच्या ऐवजी सुप्रिया सुळे हा खरा शरद पवारांचा चॉईस होता, पण शरद पवारांना सुप्रिया सुळेंना देखील कधी मुख्यमंत्री करत आले नाही. मधल्या मध्ये अजित पवारांचे मुख्यमंत्रीपद कायमचे निसटून गेले.

    – भाजपचा जमालगोटा केव्हा??

    सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून अवघे तीन महिने झालेत. तरीसुद्धा त्यांनी आपण फार मोठ्या राजकारणी असल्याचे दाखवून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोन ज्येष्ठ नेत्यांना हात लावलाय. पण म्हणून सुनेत्रा पवार आपल्या दोन मुलांच्या आधारे महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ खेळी करण्याची कुठलीही गॅरेंटी नाही. कारण तेवढे राजकीय कर्तृत्व त्यांच्यात आहे, की नाही अजून सिद्ध व्हायचे आहे. शरद पवार आणि अजित पवार सर्वोच्च पदे मिळविण्यात अपयशी ठरले. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी त्यांच्या मुलाची इच्छा असली तरी तेवढे राजकीय कर्तृत्व त्यांच्यात आहे की नाही??, या सवालाचे उत्तर पवारांच्या घरातल्या नेत्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कर्तृत्वाच्या इतिहासातून मिळू शकेल. शिवाय या सगळ्या राजकारणात भाजप सर्व पवारांना केव्हा आणि कुठे जमालगोटा देईल, तेही लवकरच दिसेल!!

    Pawar family always desperate, but failed in gaining final political win

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अखिलेश यादवांच्या खुर्ची खाली मुस्लिमांचा “राजकीय बॉम्ब” की काही दुसरीच खेळी??

    Supreme Court : शिवसेना पक्षचिन्ह खटल्याची 30 जुलै रोजी सुनावणी; नेत्यांना माध्यमांत बोलण्यापासून रोखा, सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाला फटकारले

    NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील केमिस्ट्रीच्या प्राध्यापकाला अटक; CBI ने मास्टरमाइंड म्हटले; कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न सांगितले