• Download App
    परमवीर सिंग खंडणी प्रकरण; मुंबई गुन्हे शाखेच्या दोन पोलिस निरीक्षकांना सीआयडीकडून अटक । Paramvir Singh ransom case; CID arrests two Mumbai crime branch police inspectors

    परमवीर सिंग खंडणी प्रकरण; मुंबई गुन्हे शाखेच्या दोन पोलिस निरीक्षकांना सीआयडीकडून अटक

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्हयातील आरोपी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडून सोमवारी अटक करण्यात आली आहे. सीआयडीकडून ही पहिलीच अटक असून या गुन्हयात परमवीर सिंग पोलीस, उपायुक्त अकबर पठाण सह आठजण सामील आहेत. Paramvir Singh ransom case; CID arrests two Mumbai crime branch police inspectors

    ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल याने जुलै महिन्यात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, पोलीस उपायुक्त अकबर पठाण, एसीपी श्रीकांत शिंदे, गुन्हे शाखेचे कक्ष ९ चे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, महिला पोलीस निरीक्षक आशा कोरके, संजय पाटील यांच्या सह दोन खाजगी इसम असे एकूण आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आठ जणांविरुद्ध खंडणी, मारहाण करणे, खोटे दस्तावेज बनवणे, कट रचणे प्रकरणी गुन्हा दाखल करून संजय पुनमिया आणि सुनील जैन या दोन खाजगी इसमाना अटक केली होती.



    या गुन्हयाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून एक विशेष तपास पथक गठीत करण्यात आले होते. मात्र ठाणे आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे एकाच स्वरूपाचे व या सर्व गुन्हयातील मुख्य आरोपी परमबीर सिंग असल्यामुळे ठाण्यातील ३ आणि मरीन ड्राईव्हचा १ असे एकूण ४ गुन्ह्यचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सप्टेंबर महिण्यात सोपवण्यात आला होता. सीआयडीकडून या गुन्ह्यातील साक्षी पुराव्यावरून सोमवारी पोलीस निरीक्षक नन्दकुमार गोपाळे आणि महिला पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकारी यांनी तत्कालीन वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने तक्रारदार अग्रवाल यांच्या विरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई न करण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप असल्याची माहिती सीआयडीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांनी दिली.

    सीआयडी कडून अटक करण्यात आलेली ही पहिली अटक असून इतर आरोपीची भूमिका स्पष्ट झाल्यास त्यांना अटक होईल असे जगताप यांनी म्हटले आहे. अटक करण्यात आलेले नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना मंगळवारी मुंबईतील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ८ वे न्यायालय मुंबई येथे हजर करण्यात येणार आहे.

    Paramvir Singh ransom case; CID arrests two Mumbai crime branch police inspectors

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस