• Download App
    आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर झाले जाहीर ; महाराष्ट्रात इंधन स्वस्त होण्याची शक्यता , असे तपासावे पेट्रोल आणि डिझेलचे भाव, जाणून घ्या प्रक्रिया । New rates for petrol and diesel announced today; The possibility of cheaper fuel in Maharashtra, check the price of petrol and diesel, know the process

    आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर झाले जाहीर ; महाराष्ट्रात इंधन स्वस्त होण्याची शक्यता , असे तपासावे पेट्रोल आणि डिझेलचे भाव, जाणून घ्या प्रक्रिया

    देशभरात सलग तिसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. New rates for petrol and diesel announced today; The possibility of cheaper fuel in Maharashtra, check the price of petrol and diesel, know the process


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी (IOCL) आज मंगळवारी (9 नोव्हेंबर) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. दरम्यान आज देखील इंधनाच्या दरात कोणताही चढउतार झालेला नाही. देशभरात सलग तिसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

    पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

    दिल्ली : एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.



    अशी आहे पेट्रोल आणि डिझेलचे भाव तपासण्याची प्रक्रिया

    आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

    महाराष्ट्रात इंधन स्वस्त होण्याची शक्यता

    केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे.

    New rates for petrol and diesel announced today; The possibility of cheaper fuel in Maharashtra, check the price of petrol and diesel, know the process

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’