Nawab Malik arrest : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये, अशी विचारणा ममता यांनी शरद पवारांना केली आहे. सीएम ममता यांनी या मुद्द्यावर पवारांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले आहे. Opposition leader Mamata Banerjee’s phone conversation with Sharad Pawar over Nawab Malik arrest
वृत्तसंस्था
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये, अशी विचारणा ममता यांनी शरद पवारांना केली आहे. सीएम ममता यांनी या मुद्द्यावर पवारांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली. केंद्रीय एजन्सींच्या गैरवापराच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकजूट करण्याची मागणी दोन्ही नेत्यांनी केली. भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी अनेकदा म्हटले आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या घरी उच्चस्तरीय बैठक झाली. काँग्रेस नेतेही बैठकीला पोहोचले आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनीही या बैठकीला हजेरी लावली आहे.
उद्या नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आंदोलन करणार आहेत. महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्या पाठिशी राहणार असल्याचा संदेश यातून देण्यात येणार आहे. उद्या सकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन होणार आहे.
मुंबई अंडरवर्ल्डच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने नवाब मलिक यांना अटक केली आहे. बुधवारी सकाळी नवाब मलिक यांची ईडीने चौकशी केली. तब्बल 8 तास चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर नवाब मलिक म्हणाले की, मी लढेन, मी घाबरणार नाही.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनीस, इक्बाल, साथीदार छोटा शकील आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात नवाब मलिक यांना ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. दाऊद इब्राहिमचा सहकारी सरदार शाहवली खान आणि हसीना पारकरचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्याशी नवाब मलिक यांचा करार एजन्सीच्या चौकशीत आहे.
गेल्या आठवड्यात, अंडरवर्ल्ड आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांवर ईडीने मुंबईतील विविध ठिकाणी शोध घेतला. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दाऊद इब्राहिमविरुद्ध नुकत्याच दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात ईडीचे छापे टाकण्यात आले.
Opposition leader Mamata Banerjee’s phone conversation with Sharad Pawar over Nawab Malik arrest
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App