विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. या प्रकरणी पूर्वीपासूनच लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना टाळण्याच्या भूमिकेचेही स्वागत केले.Chhagan Bhujbal
मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकारांशी बोलताना मराठी भाषेचा सन्मान, गॅस दरवाढ, सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून निवडणूक न लढवण्यासंबंधी केलेली घोषणा आदी मुद्यांना हात घातला. ते सर्वप्रथम रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती करण्याच्या मुद्यावर भाष्य करताना म्हणाले, आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्याची भाषा आपल्याला आलीच पाहिजे. आमचे मराठी भाषिक व्यवसायासाठी दुसऱ्या राज्यात जातात, ते तिकडची भाषा बोलतात. कोणतीही भाषा आलीच पाहिजे. या प्रकरणी पूर्वीपासूनच लभक्ष दिले असते तर आज ही वेळ आली नसती.Chhagan Bhujbal
माझ्या मते, आठवड्यातून एक दिवस किंवा 1 तास मराठी भाषा जुजबी मराठी भाषा शिकण्यास दिला पाहिजे. जुजबी मराठी आलीच पाहिजे. भाषेचा अपमान कुणालाही करता येणार नाही.
गॅस दरवाढीचे समर्थन
छगन भुजबळ यांनी यावेळी गॅस दरवाढीचे समर्थन करत केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळेच आज आपल्याला गॅस मिळत असल्याचा दावा केला. ते म्हणले, गॅस कुठून व कसा येतो हे सर्वांना ठावूक आहे. आपल्याकडे गॅस महाग आहे. पण बाकीच्या ठिकाणी तर गॅस मिळतच नाही. बांगलादेश, पाकिस्तान तिकडे तर मिळतच नाही. एखाद्या गोष्टीत मागणी व पुरवठा यात फरक पडला तर नक्कीच त्याच्या किंमतीत वाढ होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आधी 27 देशांतून गोळा करत होतो, आता 40-45 देशांतून करतो. त्यामुळे आपले चालले आहे.
ज्यांचे 4-5 कोटी लोकसंख्येचे देश आहेत, त्यांचे बंद पडले. पण आपला 140 कोटींचा देश असूनही भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे सर्वकाही चांगले सुरू आहे, असे ते म्हणाले.
सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचे केले स्वागत
छगन भुजबळांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामतीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना न करण्याच्या भूमिकेवरही भाष्य केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. त्यात काहीही वाईट नाही. त्यांनी एक रोडमॅप आखून दिला आहे. पवार कुटुंबीयांनी एकमेकांविरोधात न लढण्याचा. ही एक चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
One must speak the language of the state in which one lives; Minister Chhagan Bhujbal’s stance on Marathi compulsion
महत्वाच्या बातम्या
- OCI registration : नागरिकत्व प्रक्रियेत मोठा बदल, OCI नोंदणी पूर्णपणे डिजिटल; सरकारचे नवे नियम लागू
- १६ वी राष्ट्रीय जनगणना सुरू; “या” सरकारी संकेतस्थळावर अशी करा डिजिटल स्व – गणना!!
- LPG cylinder : 1 मेपासून मोठा झटका; व्यावसायिक LPG सिलिंडर तब्बल ₹993 ने महाग
- मिसिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद; उद्घाटनाच्या कार्यक्रमात दिले प्रमाणपत्र