सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलं आहे. दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं, असंही राऊत म्हणाले आहेत.No, if the same deposit is confiscated, the name of Shiv Sena will not be mentioned – Vinayak Raut
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबियांवरही टीका केली आहे.नारायण राणेंनी हिंमत असेल तर पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ, मालवणमधून निवडणुक लढवून दाखवावी. नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही.
हिंमत असेल तर रहा उभे विधानसभेला, असं म्हणत राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलं आहे. दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं, असंही राऊत म्हणाले आहेत.
सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही असे टीकास्त्रही राऊत यांनी सोडले.पण भविष्यात कधीतरी शिवसेनेच्या अंगावर आलात तर मर्द शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.
No, if the same deposit is confiscated, the name of Shiv Sena will not be mentioned – Vinayak Raut
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल