Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; सुनेच्या तक्रारीनंतर अटकपूर्व जामीन फेटाळला; कधीही होऊ शकते अटक, काय आहे प्रकरण?
ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गीतेश आणि सासरे विनायक राऊत यांच्यासह कुटुंबातील ७ जणांवर कौटुंबिक छळ आणि जादूटोणा केल्याचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने राऊत कुटुंबाचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर संरक्षण नसून, पोलिसांकडून त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई केली जाऊ शकते.