नागपूर महापालिकेची निवडणुकही आता तोंडावर आहे. त्यात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे.Nitin Gadkari-Devendra Fadnavis important meeting
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या भेटीवेळी भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते.
नागपूर महापालिकेची निवडणुकही आता तोंडावर आहे. त्यात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत विचारमंथन झालं आणि रणनितीही आखण्यात आल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. राज्यातील प्रमुख पक्षांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सगळी तयारी सुरु केली आहे. भाजपनेही आता विविध शहरातील कारभारी-नेते मंडळींवर विशेष जबाबदारी सोपविण्याचं ठरवलं आहे. त्याच्याच रणनितीचा एक भाग म्हणून प्रमुख पदाधिकाऱ्यांसह फडणवीस-गडकरींमध्ये बैठक पार पडली. परंतु या बैठकीत नागपूर महापालिका या विषय अजेंड्यावर होता.
राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आहे. विचारांनी भिन्न असलेले तिन्ही पक्षात सध्या सत्तेत आहे. नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका पार पडल्या आहेत, निकालही लागलेत.
त्यात भाजपने चांगली कामगिरी केलेली असली तरी सर्वोत्तम कामगिरी करणं जमलं नाही. त्यात नागपूर पंचायत समिती. जि.प. निकालात काँग्रेसने खूपच चांगली कामगिरी केलीय. साहजिकच भाजपसमोरची डोकेदुखी वाढलीय.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App