फार मोठे यश मिळूनही…; मांजरेकरांच्या बोलण्यातून काहीसे उलगडले नितीन चंद्रकांत देसाई!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या खळबळजनक आत्महत्येमुळे बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टी हादरली असून त्यांच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. देसाईंच्या कर्जत मधल्या स्टुडिओ वर जप्तीची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.Nitin Chandrakant Desai understood something from Manjrekar’s speech

पण त्याचवेळी गेल्या काही दिवसात नितीन देसाई पूर्वीपेक्षा वेगळे वाटायला लागले होते अशा भावना त्यांचे मित्र आणि बॉलीवुड मधले सुपरस्टार दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बोलून दाखवल्या. कला दिग्दर्शक म्हणून नितीन ग्रेट होताच. पण माझा तो चांगला मित्र होता. आपण मित्र म्हणून एकमेकांशी संपर्कात कमी पडायला लागलो आहोत, असे आता मला वाटायला लागले आहे. त्याने माझ्याशी बोलायला हवे होते. नेमके त्याच्या मनात काय सुरू होते, हे अखेरपर्यंत कोणालाच कळले नाही. फार मोठे यश मिळूनही माणूस एकाकीच राहतो, असे उद्गार महेश मांजरेकर यांनी काढले.बॉलीवूड मधले अनेक कलाकारांनी नितीन देसाईंच्या अनेक आठवणी शेअर केल्या. बॉलीवूड मधल्या बड्या बड्या सिनेमांच्या सेट उभारणीत नितीन देसाईंचा हातखंडा होता. त्यांच्या हाताचा सुवर्ण स्पर्श सेटला झाला की तो सिनेमा हिट व्हायचा अशी अनेकांची भावना होती. सलमान खान तर त्या सेटच्या एवढा प्रेमात असायचा की तो अनेक दिवस सेटवरच राहायचा.

नितीन देसाई यांचे ठाकरे कनेक्शन ही जबरदस्त होते उद्धव ठाकरे मुख्य मंत्री झाल्याबरोबर अवघ्या 20 तासांत त्यांनी शिवतीर्थावर त्यांच्या शपथविधीसाठी सेट उभारून दिला होता.

Nitin Chandrakant Desai understood something from Manjrekar’s speech

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात