• Download App
    Sana Malik भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून राष्ट्रवादीने दाखविले खायचे दात; भारतात कुराण लागू करायची सना मलिकांची मागणी; राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून राष्ट्रवादीने दाखविले खायचे दात; भारतात कुराण लागू करायची सना मलिकांची मागणी; राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात भाजपबरोबर सत्तेत राहून राष्ट्रवादी काँग्रेसने आज खायचे दात दाखविले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी भारतात कुराण लागू करायची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी सना मलिक यांचे भाषण उचलून धरले. Sana Malik

    – देवयानी फरांदेंचे परखड सवाल

    देशातील मुस्लीम महिलांना त्यांच्या धर्मातील बहुपत्नीत्वाच्या प्रथेमुळे अन्याय सहन करावा लागत आहे, या भाजपने उपस्थित केलेल्या आक्षेपाला विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी इस्लाम धर्मातील बहुपत्नीत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. देशातील मुस्लीम महिलांना त्यांच्या धर्मातील बहुपत्नीत्वाच्या (Polygamy) प्रथेमुळे अन्याय सहन करावा लागत आहे, बहु विवाहाची पद्धत पाकिस्तानात 1 टक्के आहे. या तीन महिलांची किंमत यांना कळणार आहे का??? बुरख्यातील महिला सुरक्षित नसतील, तर काय उपयोग?? युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आपलं राज्य सरकार कधी आणणार?? त्यासाठी खास टास्क फोर्स सरकार तयार करणार का?? असे सवाल देवयानी फरांदे यांनी उपस्थित केले. यावर सना मलिक यांनी भाजप आमदारांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचे समर्थन केले.



    – सना मलिक म्हणाल्या :

    देवयानी फरांदे यांनी मुस्लीम महिलांबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. पण अत्याचार मुस्लीम महिलांवरच होतो का? बहुपत्नीत्वाला मुस्लीम धर्मात मंजुरी आहे. पाकिस्तानने काही नवीन केलं नाही, पाकिस्तानने कुराणमध्ये जे सांगितलं आहे, त्याची अंमलबजावणी केली. भारतामध्येही कुराणची अंमलबजावणी करावी, ही आमची मागणी आहे. तिहेरी तलाक ही तलाकची एक पद्धत आहे, तलाख ए हसन, तलाख अहसन हे दोन्ही आम्ही पाळतो. तलाख ए बिद्दत ही वेगळी संस्कृती आहे, त्याचा आमच्या धर्मात कुठेही उल्लेख नाही. तिहेरी तलाक रद्द करण्यात आला, कायदा आणण्यात आला, भारतात जे अस्तित्त्वात नव्हतं ते रद्द केलं. त्याचा अवलंब होत असता, त्यावर कायदा झाला असता, त्याच्या विरोधात कोणी गेलं असतं, तर आम्ही त्याविरोधात आवाज उठवला असता. बहुपत्नीत्व फक्त मुस्लिमांमध्येच अस्तित्त्वात का, मुस्लीम पुरुषच अनेक महिलांशी लग्न करतात का? दुसऱ्या धर्मांमध्येही बहुपत्नीत्व आहे, फक्त मुस्लीम धर्मात बहुपत्नीत्वासाठी कायदा आहे!!

    – भाजप आणि शिंदे सेनेचा विरोध

    सना मलिक यांच्या भाषणानंतर सभागृहात गोंधळ झाला. सना मलिक यांना भाजप आणि शिंदे सेनेच्या आमदारांनी जोरदार विरोध केला. हा देश संविधानावर चालतो. कुराणावर नाही, असे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठणकावले. मात्र, अजितदादा गटाचे आमदार सना मलिक यांच्या बाजूने उभे राहिले. यामुळे महायुतीमधील अंतर्गत दुफळी समोर आली. भाजपच्या सत्तेबरोबर राहून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी खायचे दात दाखविले.

    NCP MLA Sana Malik has demanded the implementation of the Quran in India.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Anna Hazare : माहिती अधिकाराची धार बोथट केल्यास प्राणाची आहुती देईन; नियम बदलल्याने अण्णा हजारे आक्रमक, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा

    Arup Roy : बंडखोरांचे ममता बॅनर्जींना सर्वात मोठे आव्हान; टीएमसीची समांतर कार्यसमिती स्थापन केली, अरूप रॉय अध्यक्ष

    Rohit Pawar : कर्जमाफीच्या अटींवरून रोहित पवारांचा हल्लाबोल; 29 जूनला छत्रपती संभाजीनगरात महाआंदोलनाचा इशारा, विश्वासघात झालाय, आम्ही सरकारला सोडणार नाही!