Sana Malik : सना मलिक यांचे विधान वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही; सुनील तटकरेंकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (23 जून 2026) ‘तिहेरी तलाक’ आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) यावरून सत्ताधारी महायुतीमध्येच मोठा गदारोळ झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी ‘भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी’ असे वादग्रस्त विधान केले होते, ज्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज एक अधिकृत निवेदन जारी करत सना मलिक यांच्या विधानापासून पक्षाला वेगळे केले आहे. “सना मलिकांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून पक्ष त्यांच्याशी सहमत नाही,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.