– अंजली दमानियांचा आरोप; खारगे समितीचा अहवाल निव्वळ धुळफेक; विजय कुंभारांचा आरोप
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्याच्या मुंढव्यातील जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या खारगे समितीने पार्थ पवारला क्लीन चिट दिली, अशी बातमी मराठी माध्यमांनी प्रसिद्ध केली. प्रत्यक्षात खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर झाला त्यानंतर तो अहवाल बावनकुळे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करतील. त्यानंतर देवेंद्र फडणवीस त्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील. Parth Pawar
मात्र मुंढवा जमीन घोटाळ्यात खारगे समितीने अहवाल दिला. त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली पण पार्थ पवारला क्लीन चीट दिली, अशी बातमी मराठी माध्यमांनी परस्पर दिली. मात्र या संदर्भात अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी स्पष्ट खुलासा केला. जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारला कुठलीही क्लीन चीट दिलेली नाही कारण हे प्रकरण आता कोर्टात आहे जोपर्यंत कोर्टाचा निर्णय कुठला येत नाही तोपर्यंत पार्थ पवारला क्लीन चीट देताच येणार नाही. पण पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसला घाई झाली आहे म्हणूनच त्यांच्यातल्या सूत्रांनी माध्यमांमध्ये पार्थ पवारला जमीन घोटाळ्यात क्लीन चीट दिल्याची बातमी पेरली, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
2021 ची पॉवर ऑफ ॲटर्नी असून सुद्धा पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही. खारगे समितीचा अहवाल म्हणजे निव्वळ धुळफेक आहे. सत्याचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप विजय कुंभार यांनी केला.
सुप्रिया सुळे यांची मखलाशी
मात्र या सगळ्यात सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतून पार्थ पवारचीच बाजू घेतली. त्यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांच्या संस्कारांची टिमकी वाजवली. आमच्या घरात जे संस्कार झालेत त्या संस्कारांमुळे कुणीच व्यक्ती काही चुकीचे करणार नाही पार्थला सुद्धा मी त्यावेळी जेव्हा फोन केला होता, त्यावेळी त्याने काही चुकीचे केले नाही असेच सांगितले होते. पण आता संबंधित प्रकरण कोर्टात आहे त्यावर आपण कसे बोलणार?, अशी मखलाशी सुप्रिया सुळे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App