प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान होत असताना या निवडणुकीत सहावा उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते कोणत्याच पक्षांकडे नसल्याने एक-एक मत महत्त्वाचे मानले जात आहे. याकरता लहान सहान पक्ष, अपक्ष यांची मदत घेण्यात येत आहे. पण सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघे अटकेत आहेत. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नव्हते. याकरता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाची दारे ठोठावली होती. यावर सुनावरणी झाली असून न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. Nawab Malik, Anil Deshmukh also hit by the High Court; Voting is not allowed
Anil Deshmukh CBI : अनिल देशमुख तब्येतीच्या आडून सीबीआय चौकशी टाळतात; स्पेशल कोर्टात सीबीआयचा आरोप
देशमुखांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही
१२ वाजेपर्यंत १७० आमदारांनी मतदान केले आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात दाखल झाले आहेत. तर काँग्रेसच्या ४४ आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अशातच हे मतदान सुरू असतानाच महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. अनिल देशमुखांची यांची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना राज्यसभेत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. तर नवाब मलिक यांच्या अर्जावर सुनावणी सुरू होती. यामध्ये देखील मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून झटका मिळाला आहे.
नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयही ही ठाम आहे. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदान करण्याची परवानगी मिळवी अशी मागणी करत ते पुन्हा याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे नवाब मलिकांसह अनिल देशमुखांना तूर्तास मतदानाची परवानगी देण्यात आली नसल्याचे दिसतेय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App