विशेष प्रतिनिधी
अमरावती : Navneet Rana एका मौलानाने त्यांना 4 बायका आणि 19 मुले असल्याचे सांगितले होते. यावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि 19 मुले आहेत. तो म्हणतो की मला 30-35 मुले पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्यापणे चार बायका 19 मुले पाहिजे असे म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन-तीन-चार-चार मुले जन्माला घातली पाहिजे, असे राणा यांनी म्हटले आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्याला 4 बायका आणि 19 मुले असल्याचे सणीतले होते. यावरून राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Navneet Rana
नवनीत राणा म्हणाल्या, मी सगळ्या हिंदू लोकांना सांगते की जर ते खुलेपणे सांगत असतील की 4 बायका आणि 19 मुले आहेत तर आपण किमान तीन-तीन चार-चार मुले जन्माला घातली पाहिजेत. त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तानला बनवायचा आहे. ते मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालत आहेत, तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो? आपणही तीन ते चार मुले जन्माला घातली पाहिजेत यामध्ये काही दुमत नाही.Navneet Rana
नवनीत राणा यांनी मुर्शिदाबाद येथील मशिदीच्या मुद्द्यावरून मोठे विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, कॉंग्रेसने आजवर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनरजी यांच्या आमदारांनीही तेच करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. तसेच जर बाबरच्या नावाने मशीद बांधली गेली, तर कारसेवक तिथे जातील, कारसेवा करतील आणि ती तोडण्याचे काम करतील, असेही विधान राणा यांनी केले.
मजबूरी म्हणून ठाकरे बंधूंची युती
दरम्यान, पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, शरद पवार हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. अजित दादा शरद पाव हा त्यांचा परिवार आहे. अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले होते की मला भाजप सोबत जायला शरद पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे दोन पवार एकत्र होत असतील, तर चांगलेच आहे. दोन ठाकरे एकत्र येत आहेत, त्यांची मजबूरी आहे. त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, असेही नवनीत राणा म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App