• Download App
    Navnath Ban‘पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी ४० आमदार का गेले ते पाहा’; नवनाथ बन यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

    Navnath Ban : ‘पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी ४० आमदार का गेले ते पाहा’; नवनाथ बन यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

    Navnath Ban

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Navnath Ban भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना, “पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी तुमच्या पक्षातील ४० आमदार का बाहेर पडले, याचा विचार करा,” असा टोला लगावला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत अनेक गंभीर आरोप केले.Navnath Ban

    नवनाथ बन म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड केले. “आदित्य ठाकरेंची दादागिरी सर्वांनी पाहिली आहे. मातोश्रीचे दरवाजे आमदारांसाठी कसे बंद होते, हेही सर्वांना माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या अहंकारामुळेच अनेकांनी पक्षाची साथ सोडली,” असा दावा त्यांनी केला.Navnath Ban

    ‘ऑपरेशन सिंदूर’वरूनही टीका

    संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात पुरावे मागितल्याचा उल्लेख करत नवनाथ बन यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “कारवाई झाली म्हणून काही लोकांच्या पोटात दुखू लागले. राऊत हे उबाठाचे नव्हे, तर पाकिस्तानचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात,” अशी टीका त्यांनी केली.Navnath Ban



    ‘देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना पाठीशी घालत नाहीत’

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे समर्थन करताना बन म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने गुन्हेगारांना संरक्षण दिले गेले, ते महाराष्ट्राने पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस मात्र कोणालाही पाठीशी घालत नाहीत. पुण्यातील प्रकरणात दोषी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे सिद्ध झाले.”

    यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरणाचाही उल्लेख करत ठाकरे गटावर निशाणा साधला.

    ‘आमदारांच्या अवैध धंद्यांचे पुरावे द्या’

    संजय राऊत यांनी काही आमदारांवर अवैध दारू व्यवसायाचे आरोप केल्याबद्दलही नवनाथ बन यांनी प्रश्न उपस्थित केले. “कोणत्या आमदारांचे अवैध धंदे आहेत, याचे पुरावे राऊत यांनी जनतेसमोर ठेवावेत. केवळ आरोप करून चालणार नाही,” असे ते म्हणाले.

    ‘१७ पैकी १७ जागा महायुतीच जिंकणार’

    विधान परिषद निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना नवनाथ बन म्हणाले, “महायुती १७ पैकी १७ जागा जिंकेल. विरोधकांनी १७ उमेदवार दिले तरी निकाल बदलणार नाही. ही निवडणूक १७ विरुद्ध शून्य अशी होईल.”

    यावेळी त्यांनी ठाकरे गटावर उपरोधिक टीका करत, “महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला नाकारले आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक महाराष्ट्रात नव्हे तर लाहोर किंवा रावळपिंडीत लढवावी,” असे वक्तव्य केले.

    दरम्यान, नवनाथ बन यांच्या या टीकेनंतर ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीतील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

    Look Inside Before Criticizing Parth Pawar: BJP’s Navnath Ban Attacks Thackeray Faction

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाने शरद पवार गटाला धक्का; सुप्रिया सुळे म्हणाल्या- शुभेच्छा, जयंत पाटील म्हणाले- धक्कादायक निर्णय

    Laxman Hake : ‘जरांगे बाजेवर बसले तर आम्ही ढेकळात बसू’; लक्ष्मण हाकेंचा इशारा, मराठा-ओबीसी वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे

    Shahu Chhatrapati : मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका; शाहू महाराजांचा सरकारला इशारा