Navnath Ban : ‘राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता एकत्र येण्याची भाषा करतायत’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात
महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मनसे अध्यक्ष Raj Thackeray आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले असताना भाजपने या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते Navnath Ban यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत, “राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारेच आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत,” असा आरोप केला.