• Download App
    Maharashtra Political News 2026 | The Focus India

    Maharashtra Political News 2026

    Navnath Ban : ‘पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी ४० आमदार का गेले ते पाहा’; नवनाथ बन यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

    भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना, “पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी तुमच्या पक्षातील ४० आमदार का बाहेर पडले, याचा विचार करा,” असा टोला लगावला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत अनेक गंभीर आरोप केले.

    Read more

    Nitesh Rane : संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही; संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा

    राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लवांडे यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. लवांडे वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Sanjay Raut : संजय राऊतांचा आजारपणावर मोठा खुलासा; कॅन्सरचे झाले निदान, स्वत: मुलाखतीत दिली माहिती

    गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर खुद्द संजय राऊत यांनीच या मौनाला पूर्णविराम दिला आहे. “मला पोटाचा कॅन्सर झाला होता,” असा धक्कादायक पण तितकाच धाडसी उलगडा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या वैयक्तिक लढाईतून ते आता यशस्वीपणे बाहेर पडत असून, त्यांनी पुन्हा एकदा राजकीय मैदानात पूर्ण ताकदीने एन्ट्री केली आहे.

    Read more