• Download App
    Nasrapur atrocity case to be investigated by Special Investigation Team; Fadnavis government's decision नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम कडे; फडणवीस सरकारचा निर्णय

    नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम कडे; फडणवीस सरकारचा निर्णय

    Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नसरापूर येथे भीमराव कांबळे या 65 वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला असून हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी देण्याची मागणी होत असताना फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने या प्रकरणाचा तपास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम कडे सोपविला.Nasrapur atrocity case to be investigated by Special Investigation Team; Fadnavis government’s decision

    नसरापूर घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली. नसरापूरच्या घटनेनंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला. नसरापूरमधील नागरिकांनी शनिवारी पुण्यातील नवले पुल बंद केला होता. त्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्यासाठी सरकारने हालचालींचा वेग वाढाविला.



    – दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश

    सरकारने नेमलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये पुणे ग्रामीण पोलीस विभागातले अधिकारी असून त्यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नसरापूरच्या घटनेचा संपूर्ण सखोल तपास करून विशिष्ट वेळेत सरकारकडे अहवाल सादर करण्याची या इन्व्हेस्टिगेशन टीम कडे जबाबदारी दिली आहे.

    Nasrapur atrocity case to be investigated by Special Investigation Team; Fadnavis government’s decision

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा reverse effect; डायरेक्ट शरद पवारांनाच ठोकून काढायची सत्ताधाऱ्यांना संधी!!

    Pune TCS : TCS कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ; ‘मानसिक छळ, अपमानामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले’, सुसाईड नोटमधील आरोपांनंतर गुन्हा दाखल

    ashok kharat : अशोक खरात प्रकरणात सरकारचे मोठे पाऊल; उज्ज्वल निकम मैदानात, भोंदूबाबाच्या अडचणी वाढणार?