प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं,’ असे शेट्टी म्हणाले. N.D. Patil was a walking university in the state, said Raju Shetty
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांचे पार्थीव अत्यंदर्शनासाठी कदमवाडी परिसरातील शाहू कॉलेज येथे ठेवण्यात येणार आहे.तसेच उद्या मंगळवारी कोल्हापुरातच पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं,’ असे शेट्टी म्हणाले.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधतना मम्हणाले की , प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी ऐकण्यास मन तयार होत नाही.तसेच एन. डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं. ते आंदोलनात उतरल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना दखल घ्यावी लागायची, असं राजू शेट्टी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App