mumbai ncb : एनसीबीने ड्रग्जद्वारे केक बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी ड्रग्ज असणारे केक सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना विकत होती. एनसीबीचे मुंबई झोनल संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, अशी एक टोळी असल्याची माहिती मिळाली होती. ही टोळी एक ड्रग वापरून केक बनवायची आणि नंतर ती हाय प्रोफाइल ग्राहकांना विकत होती. mumbai ncb caught the gang making cake with drugs sell on cake pastry for 1000 rupees
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एनसीबीने ड्रग्जद्वारे केक बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी ड्रग्ज असणारे केक सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना विकत होती. एनसीबीचे मुंबई झोनल संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, अशी एक टोळी असल्याची माहिती मिळाली होती. ही टोळी एक ड्रग वापरून केक बनवायची आणि नंतर ती हाय प्रोफाइल ग्राहकांना विकत होती.
या प्रकरणात एनसीबीने एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे, या आरोपींचे इंस्टाग्रामवर एक पेज आहे, जेथे हे लोक त्यांच्या केकचा प्रचार करत होते. आणि मग ड्रग्जची ऑर्डर ग्राहकांकडून वैयक्तिक संदेश (डीएम-डायरेक्ट मेसेज) च्या माध्यमातून धेत होते. एनसीबीला 830 ग्रॅम एडिबल वीड पॉट बरौनी, ज्याला एडिबल कॅनेबीदेखील म्हटले जाते ते मिळाले. त्या बेकरीमधून एनसीबीने एक महिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली, तिचे नाव इल्स्टॉन ऊर्फ फर्नांडीस आहे. चौकशीदरम्यान एनसीबीला त्यांच्या ड्रग सप्लायरची माहिती मिळाली ज्याचे नाव जगत चौरसिया आहे, एनसीबीने त्याला वांद्रे भागातून 125 ग्रॅम गांजासह अटक केली.
एनसीबीने सांगितले की, हे लोक थेट सोशल मीडियावर ऑर्डर घ्यायचे आणि एक किलो केकचे 10 तुकडे बनवून प्रत्येक तुकडा 1000 रुपयांना विकत होते. हे भारतातील पहिले प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. यात ड्रग पेडलर्स ग्राहकांना ड्रग्ज घालून बनवलेले केक विकत होते.
चौकशीदरम्यान असे आढळले की, या आरोपींनी इंटरनेट वापरून असे ड्रग्जचे केक बनविणे शिकले. ते गेल्या एक वर्षापासून ड्रग्ज केकचा व्यवसाय करत होते. त्यांच्याकडून ग्राहकांची यादी एनसीबीला मिळाली आहे, आता एनसीबी त्यांची चौकशी करत आहे.
mumbai ncb caught the gang making cake with drugs sell on cake pastry for 1000 rupees
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App