• Download App
    अहमदनगरमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ । MSEB employee commits suicide, Incident at Ahmednagar

    अहमदनगरमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ

    वृत्तसंस्था

    अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव महावितरणच्या वायरमनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप शांताराम कडाळे ( वय २५ , रा. कडाळेवस्ती , घारगाव, ता. संगमनेर ) असे या वायरमनचे नाव आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. MSEB employee commits suicide, Incident at Ahmednagar

    कडाळे हे गुरुवारी ( ता.२३ ) नेहमीप्रमाणे घारगाव महावितरण येथे कार्यरत होते. अकलापुर रोड येथील एका कॉम्प्लेक्समध्ये ते राहण्यास होते. गुरुवारी रात्री कडाळे यांनी बेडरूमचा दरवाजा लावला. ते सकाळी दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या पत्नी पूजा यांनी कडाळे यांच्या मित्रांना फोनवरून कळविले. मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कडाळे यांच्या मित्रांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कडाळे यांनी लोखंडी हुकाला कापडी बेडशीट बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.



    शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात कडाळे यांंचा मृतदेह पाठवला आहे. वायरमन कडाळे हे या ठिकाणी  पत्नीसोबत दोघेच राहत होते. कडाळे यांनी आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गणेश विठ्ठल लेंडे (वय-२५, रा. खंदरमाळ) यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.

    MSEB employee commits suicide, Incident at Ahmednagar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!