दुटप्पी : विधिमंडळात विरोधकांच्या आंदोलनाला शरदनिष्ठ आमदारांची दांडी; विधानसभेत मुश्रीफांच्या शेजारी जयंत पाटलांची खुर्ची!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुटप्पी राजकीय भूमिका उघड झाली. प्रत्यक्षात अधिवेशन सुरू होण्याआधी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे – फडणवीस सरकार विरोधात आंदोलन केले, त्यावेळी शरदनिष्ठ गटाचे आमदार तिथे हजर नव्हते. या आंदोलनाला शरदनिष्ठ गटाच्या आमदारांनी दांडी मारली. त्याच वेळी प्रत्यक्ष विधानसभेत शरदनिष्ठ गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची खुर्ची सत्ताधारी बाकांवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शेजारी होती. MLAs loyal to the opposition movement in the Legislature

कालच अजित पवारांनी आपल्या 9 मंत्र्यांसह यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना राष्ट्रवादी एकसंध राखण्याची विनंती केली होती. मात्र सुमारे तासभर चाललेल्या त्या बैठकीच्या वेळी शरद पवारांनी मौन धारण केले होते.

या बैठकीनंतर एका कार्यक्रमात शरद पवारांनी आपण भाजपबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पवारांच्या या भूमिकेची माहिती शरदनिष्ठ गटाचे युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सोशल मीडिया वरून दिली होती.

दरम्यानच्या 12 तासांमध्ये भरपूर घडामोडी घडल्या. शरद पवारांनी आपला बंगलोर दौरा अचानक रद्द करून विरोधी पक्षांच्या बैठकीला दांडी मारली. त्याच वेळी विधानसभेत शरदनिष्ठ गटाच्या आमदारांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांची बैठक व्यवस्था कशी असेल याची चर्चा सुरू असतानाच जयंत पाटलांची खुर्ची हसन मुश्रीफांच्या शेजारी असल्याचे स्पष्ट झाले. अर्थातच या घडामोडींमुळे शरद पवारांची नेहमीची दुटप्पी राजकीय भूमिका समोर आली.

MLAs loyal to the opposition movement in the Legislature

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात