भाजपचे “काँग्रेस संस्कारित” मंत्री जयकुमार गोरेंवर 354 अ, 509 कलमांनुसार लैंगिक छळाचे गुन्हे दाखल; पण…

विशेष प्रतिनिधी

मुंबई : संतोष देशमुख प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे “पवार संस्कारित” मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याबरोबर फडणवीस मंत्रिमंडळातील “काँग्रेस संस्कारित” भाजपच्या एका मंत्र्याचे लैंगिक छळाचे प्रकरण बाहेर आले असून आता त्या मंत्र्याविरोधात आणि त्यानिमित्ताने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण बाहेर आले आहे. संबंधित महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची वंशज असल्याचे सांगितले जात आहे.

यासंदर्भात मराठी माध्यमांनी विविध बातम्या देऊन फडणवीस सरकार आता देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या भाजपच्याच मंत्र्यामुळे अडचणीत आल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. 2016 पासूनचे हे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. जयकुमार गोरे यांनी जिल्हा न्यायालयात या संदर्भात लेखी माफी मागितली. पण नंतर अश्लील फोटो पाठवून आपला पीए अभिजीत काळे यांच्यामार्फत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली, असे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

जयकुमार गोरे हे सध्या फडणवीस मंत्रिमंडळात भाजपचे मंत्री असले तरी ते मूळचे भाजपचे नाहीत, तर ते मुळात “काँग्रेस संस्कारित” नेते आहेत. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते माण मतदार संघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 नंतर महाराष्ट्रात भाजपची राजकीय चलती सुरू झाल्यानंतर जयकुमार गोरे हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले, पण त्यांचे जुने कारनामे आता मराठी माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी आता बाहेर काढले. पण गोरे यांच्या कारनाम्यांच्या बातम्या देताना मराठी माध्यमांनी ते मूळचे काँग्रेसचे आमदार होते, याचा उल्लेख टाळला आहे.

जयकुमार गोरे यांनी लैंगिक छळ केल्याचे भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अ आणि कलम 509 यानुसार आधीच गुन्हे दाखल आहेत. मात्र या प्रकरणाचा अंतिम निकाल अजून आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावरचा दोषारोप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जयकुमार गोरे यांच्या संदर्भात कोणती भूमिका घेतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Minister Jayakumar Gore in trouble over alleged obscene photo

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात