• Download App
    महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन । Metro to run in Pune before municipal elections; It will be inaugurated by Prime Minister Narendra Modi

    महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन

    वृत्तसंस्था

    पुणे : महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याचे वृत्त आहे. पुणे महापालिका बरखास्तीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठड्यात हा दौरा होणार आहे. ते पुणे मेट्रोचे उद्घाटन, महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण करणार आहे.आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उदघाटन तसेच प्रकल्पांचे लोकार्पण व भूमीपूजनाचे कार्यक्रम या दौऱ्यात होणार आहे.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या महिन्यात पुणे दौरा स्थगित केला होता. पुणे महापालिकेची १४ मार्चला मुदत संपत आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या हस्ते मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर फडणवीसांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी मोदींच्या हस्तेच पुणे मेट्रोचं उद्घाटन होईल, असं फडणवीस म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुण्यातील मेट्रोची पाहणी केली होती.

    Metro to run in Pune before municipal elections; It will be inaugurated by Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा