मनोज जरांगे फिरले, आता अजितदादांचे राजकारण येवल्याचा अलिबाबा आणि परळी गॅंग संपवत असल्याचे आरोप केले

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने अजित पवारांच्याही राजकारणाचा देव्हारा बसवायची भाषा करणारे मनोज जरांगे आज फिरले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज वक्तव्य केले. Manoj Jarange

येवल्याचा अलिबाबा छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे याची परळी गॅंग यांनी अजित पवारांचे राजकारण संपवायचा घाट घातल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी भाषण करून मनोज जरांगे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. तुम्हाला सगळीकडूनच आरक्षण पाहिजे. त्यात ओबीसींच्या ताटातही खायचे आहे, असे टीकास्त्र धनंजय मुंडे यांनी सोडले होते.



धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना आपल्या नादी लागू नको, नाहीतर तुझ्या राजकारणाचा देव्हारा बसवीन. तुझ्याबरोबर अजित पवारांच्या राजकारणाचा देव्हारा बसवीन, अशी दमबाजी केली होती‌. पण पण आज मनोज जरांगे त्यांच्या या जुन्या वक्तव्यावरून 360 अंशात फिरले. त्या उलट अजित पवारांचे राजकारण संपवण्याचा डाव छगन भुजबळ म्हणजेच येवल्याचा अलिबाबा आणि धनंजय मुंडे यांच्या परळी गॅंगने आखल्याच आरोप केला.

मनोज जरांगे यांच्या नव्या आरोपामुळे अजित पवारांचे राजकारण नेमके कोण संपवणार याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली.

Manoj Jarange target to Ajit Pawar NCP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात