मनसेला धमकी : मौलाना-उलेमा सांगतील, तरच भोंगे उतरवू… पण…!! पीएफआयचा निर्णय

प्रतिनिधी

मुंबई : मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यास ३ मे हा अल्टिमेटम दिला आहे. मात्र त्यावरून पी एफ आय मुस्लिम संघटनेने तिला धमकी दिली असून पीएफआयचे प्रमुख अब्दुल मतीन शेखानी यांनी जरी मनसेने अल्टिमेटम दिला तरी या विषयावर मौलाना आणि उलेमा हे चर्चा करतील आणि तेच निर्णय घेतील, तो निर्णय सर्व मुसलमान मान्य करतील, असे सांगितले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.Manase has given an ultimatum on May 3 to lower the horns on mosques.

एबीपी माझाशी बोलताना अब्दुल मतीन शेखानी म्हणाले की, सध्या गोवा, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांत राम नवमीच्या दिवशी मशिदीवर भगवा झेंडा फडकवणे, मशीद जाळणे असे प्रकार घडले, त्यामुळे पीएफआयने त्याविरोधात  शुक्रवारी, १५ एप्रिल रोजी देशभरात आंदोलन केले, म्हणून मुंब्र्यातही आंदोलन केले. भोंग्याच्या संबंधी आम्ही कुणाला धमकी देत नाही, आमच्या वक्तव्याचा नीट संदर्भ जाणून घ्या, छेडेंगे तो नही छोडेंगे, हा आमचा नारा आहे, कुणी जबरदस्तीने मशिदीवर आक्रमण करू नये, आमच्या मालमत्तेवर कोणी आक्रमण करू नये, संविधानानुसार आम्हाला जे अधिकार दिले आहेत, त्याआधारे आम्ही आंदोलन करणार आहोत, असेही अब्दुल मतीन शेखानी म्हणाले. मी कोणत्या राजकीय पक्षाचा नेता नाही, आमचीही हीच भूमिका आहे,

महाराष्ट्रात शांततापूर्ण वातावरण असावे, भोंग्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर मौलाना, उलेमा हे धर्मगुरू चर्चा करतील आणि निर्णय देतील. आम्ही सगळे मुस्लिम समाज तो निर्णय मानतील. मनसेने ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला आहे, मात्र आमच्यासाठी आमचे धर्मगुरू महत्वाचे आहेत. या अल्टिमेटमध्ये भोंगे खाली ते उतरवतील की नाही, हे मला माहिती नाही, आमचे धर्मगुरू त्यावर निर्णय घेतील, असेही अब्दुल मतीन शेखानी म्हणाले.

– राष्ट्रवादीचे नेते भडकवत आहेत

तर मनसेचे नेते अमेय खोपकर म्हणाले की, काही राजकारण्यांना हिंदू-मुसलमान यांच्यात दंगली घडवायच्या आहेत. जितेंद्र आव्हाड मुसलमानांना  भडकवत आहेत. मनसेचे काय म्हणणे आहे, हे पीएफआय संघटनेने नीट समजून घेतले नाही. माथी भडकवण्याचे प्रकार चालवले जात आहेत, जर महाराष्ट्राला धक्का लागला, महाराष्ट्र सैनिकाच्या केसाला धक्का लागला, तर सहन करणार नाही. तुमचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, ते तुम्हाला भडकावत आहेत, चुकीच्या पद्धतीने सांगत आहेत. आमचा अजानला विरोध नाही, न्यायालयाचा निर्णय आहे, त्यानुसार बेकायदेशीर भोंगे मुस्लिमांनी उतरवले पाहिजेत, असे खोपकर म्हणाले.

Manase has given an ultimatum on May 3 to lower the horns on mosques.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात