नागपूर, संभाजीनगर, नाशिक मध्ये महिंद्रा कंपनीची 15000 कोटींची गुंतवणूक, 15000 रोजगार; गडचिरोलीतही सुपर स्मेल्टर्स कंपनीची हजारो कोटींची गुंतवणूक

Mahindra Company

विशेष प्रतिनिधी

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांमध्ये प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा स्थापन करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.Mahindra Company invests Rs 15,000 crores in Nagpur, Sambhajinagar,15,000 jobs; Super Smelters Company invests thousands of crores in Gadchiroli too

✅ ICE आणि EV प्रवासी वाहने
✅ हलकी, मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने
✅ ट्रॅक्टर आणि शेतीची यंत्रसामग्री
✅ महिंद्रा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज लिमिटेडची उत्पादने
✅ कॅप्टिव्ह सप्लायर पार्क

यामार्फत एमआयडीसी बुटीबोरी (नागपूर), एमआयडीसी आडवण (इगतपुरी) आणि छत्रपती संभाजीनगर येथे एकूण ₹15,000 कोटींच्या गुंतवणुकीतून या सुविधा विकसित केल्या जातील, ज्यामुळे 15,000 पेक्षा अधिक रोजगार संधी निर्माण होतील.



यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑटो आणि फार्म सेक्टर) राजेश जेजुरीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

– गडचिरोलीत 10,100 कोटींची गुंतवणूक

याचवेळी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र शासन’ आणि ‘सुपर स्मेल्टर्स लिमिटेड’ यांच्यात गडचिरोली येथे इंटिग्रेटेड स्टील प्लांट उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत ₹10,100 कोटींची गुंतवणूक होणार असून यामुळे 1000 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या गुंतवणुकीमुळे गडचिरोली परिसरात औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Mahindra Company invests Rs 15,000 crores in Nagpur, Sambhajinagar,15,000 jobs; Super Smelters Company invests thousands of crores in Gadchiroli too

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात